शिल्प साकारण्यासाठी कलाकाराच्या मनात त्याची आकृती तयार व्हावी लागते. शिल्प साकारताना माध्यमापेक्षाही कलाकाराची सृजनशीलता अधिक महत्वाची असल्याने ज्यावेळी यासर्वांचा मिलाफ होतो त्याचवेळी एक अप्रतिम शिल्प साकार होते. कोकणच्या ग्रामीण भागात बांबू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे . गेली ५० वर्षे आपण बांबू याच माध्यमात शिल्पे साकारत आहोत. संगमेश्वर तालुक्यातील युवा कलाकारांसाठी आपण लवकरच पैसा फंडच्या कलादालनात बांबू शिल्पकलेचे प्रात्यक्षिक दाखविणार असल्याचे मुंबईचे प्रसिध्द बांबू शिल्पकार रमेश दाते यांनी स्पष्ट केले.
रमेश दाते यांनी मुंबईच्या ज. जी. कला महाविद्यालयातून शिल्प कलेचे शिक्षण घेतले. कोणताही कलाकार शिल्प घडविताना विशिष्ट माध्यमात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असतो. दाते यांनी बांबू पासून शिल्प घडविण्यास सुरुवात केली आणि गेली ५० वर्षे त्यांनी बांबू याच माध्यमातून हजारो शिल्पे घडविली. रमेश दाते आणि रहेजा स्कूल ऑफ आर्ट आणि टेक्निकल इन्स्टिट्यूट वरळीचे माजी प्राचार्य प्रकाश पेठे यांनी नुकतीच काष्ठ शिल्पकार दिलीप म्हैसकर यांच्यासह व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कलादालनाला भेट दिली. संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन कलावर्ग , कलादालन उपक्रमाची मान्यवरांना माहिती दिली.
पैसा फंडच्या कला विभागातर्फे सन २००० पासून राबविण्यात येत असलेल्या कलासाधना या चित्रकला वार्षिकची बारकाईने पहाणी करुन यातील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे दाते आणि पेठे यांनी कौतूक केले. सन २००८ – ०९ साली कलावर्ग उपक्रम सुरु केल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात सन २०२१ रोजी कलादालनाची निर्मिती करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबध्द केलेली पैसाफंड कलादालन ही रंगीत पुस्तिका पाहून उपस्थित मान्यवर भारावून गेले. मुंबई सारख्या मोठ्या शहरात आम्ही अनेक शाळांना भेटी दिल्या आहेत मात्र पैसा फंडच्या कलाविभागा सारखी मेहनत आणि विद्यार्थी घडविण्याची मेहनत आम्हाला दिसली नाही, असे गौरवोद्गार प्रकाश पेठे यांनी काढले. येथील कलावर्गातून कला महाविद्यालयासाठी आवश्यक फाऊंडेशनचे काम करुन घेतले जाते हे कौतुकास्पद असल्याचे पेठे यांनी नमूद केले.
व्यापारी पैसा फंड संस्था कलेच्या वृध्दीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून कला विभागातर्फे गरीब आणि होतकरु मुलांना कलासाहित्य देखील देण्यात येते अशी माहिती संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी यावेळी उपस्थितांना दिली.बांबू शिल्पकार रमेश दाते यांनी परिसरातील युवा कलाकारांसाठी बांबू शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे मान्य केल्याबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थे तर्फे सचिव धनंजय शेट्ये यांनी समाधान व्यक्त करुन या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी परिसरातील अधिकाधिक युवा कलाकार उपस्थित रहातील अशी ग्वाही रमेश पेठे यांना दिली.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !