संगमेश्वर : कानरकोंड गावातील ग्रामस्थांची एकी, शाळेबद्दल असलेलं अपार प्रेम तसेच या शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ यांच्यातील समन्वयामुळेच शाळेचा कायापालट झाला. शाळेच्या सुशोभिकरण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामुळेच कानकोंड शाळेला आदर्श पुरस्कार प्राप्त झाला असे प्रतिपादन संगमेश्वर तालुक्याचे उपसभापती पर्शुराम वेल्ये यांनी केले. कानरकोंड येथे झालेल्या कृतज्ञता पुरस्कार सोहळयात ते बोलत होते.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बु. कानरकोंड येथे नुकताच आदर्श शाळा व शाळेचे शिक्षक नथुराम पाचकले यांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. शाळेला बहुमोल सहकार्य करणार्या मान्यवर व देणगीदारांप्रती कृतज्ञता सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला जि. प. सदस्या माधवी गीते, उपसभापती पर्शुराम वेल्ये, पंचायत समिती सदस्या वेदांती पाटणे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर गीते, गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवणे, मनीषा बने, गावप्रमुख सुभाष कानर, माजी सरपंच नुतन शिगवण, कानरकोंड गावचे मानकरी जनार्दन सुर्वे, मुंबई ग्रामविकास कमिटीचे अध्यक्ष किशोर कानर, ग्रुप ग्रामपंचायत आंबेेड बुद्रुकचे माजी सरपंच दत्ताराम कानर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नयना कानर, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, ग्रामविकास मंडळ मुंबई व स्थानिक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाळेच्या कौतुकास्पद कामगिरीचा आलेख मांडताना जि. प. सदस्या माधवी गीते म्हणाल्या, येथील शिक्षकांची शाळेप्रती असलेली आपलेपणाची भावना, शाळा सुशोभिकरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, ग्रामस्थांची ऐकी, विकासकामात सदैव तत्परता, शिक्षकांचे ग्रामस्थांबरोबर असलेले स्नेहाचे संबंध यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला. ‘एकीचे बळ, मिळते फळ‘ असे म्हणत शिवसेनेच्या माध्यमातून आपण अनेक कामे केल्याचे त्यांनी सांगितले. बोलत असताना त्यांनी अचानक एक कागद काढला आणि हात उंचावत म्हणाल्या या गावातील विहीरीसाठी 3.50 लाखाचा निधी उपलब्ध केल्याचे सांगत कागदपत्र ग्रामस्थांच्या हातात दिले. त्यांच्या या सरप्राईजने ग्रामस्थांनी जोरदार टाळयांचा गडगडात केला. आपण नुसते बोलत नाही तर काम करुन दाखवतो असेही त्या म्हणाल्या.
पं. स. सौ. सदस्या वेदांती पाटणे, सौ. मनिषा बने यांनी आपल्या मनोगतातून गावातील एकी आणि शाळेप्रती असलेल्या ओढीतून साधलेला विकासावर चर्चा करुन ग्रामस्थांना व शाळेला शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवणे यांनी शाळेच्या वाटचालीबद्दल आणि उपक्रमशील शिक्षकांचे तोंडभरुन कौतुक केले. या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नथुराम पाचकले व गावचे सुपुत्र आदर्श शिक्षक विलास कानर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गणेशाची प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला. तसेच दुर्गम भागातील कानरकोंडच्या विविध विकासकामांच्या व शाळेच्या बातम्या तरुण भारतच्या माध्यमातून जिल्हाभर प्रसिध्दी देणार्या तरुण भारतचे पत्रकार समीर शिगवण यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गणेशाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
कानरकोंड ग्रामविकास समितीचे मुंबई अध्यक्ष व सतत गावासाठी धडपडणारे किशोर कानर यांनी उत्साहपूर्ण भाषण केले. मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून गावात विकासकामांची झालेली प्रगती आणि गेली अनेक वर्षे केवळ शिवसेनेशी असलेली एकनिष्ठता त्यांनी यावेळी विषद केली. ग्रामस्थांची एकी हेच या गावाचे वैशिष्टय असल्याचे सांगत सर्वांचे तोंडभरुन कौतुक केले.
यावेळी शाळेला बहुमोल देणगी देणार्या देणगीदारांचे आणि उपस्थित मान्यवरांचे शाल , श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन आभार व्यक्त करण्यात आले. शाळेच्या भौतिक विकासाकरिता लाभलेले देणगीदार शांताराम माटे, सौ. रेश्मा भेकरे, श्री. दिपक रा.कानर, शाळेसाठी 80 हजार रुपयांची भरघोस देणगी देणारे दानशूर श्री. कनगुटकर, वांद्रीच्या माजी सरपंच सौ.अनिषा नागवेकर, श्री. रघुनंदन भडेकर, श्रीम.वैजयंती कानर, सौ.शकुंतला कानर, श्री.विलास देसाई, श्री.मंगेश शिगवण, श्री.किशोर कानर, श्री.आत्माराम कानर, श्री.दिपक स.कानर, श्री.सुभाष तु.कानर, श्री.दिलीप कानर, श्री.विलास कानर, श्री. संतोष कानर, श्री.काशिराम कानर, श्री.काशिनाथ खापरे, श्री.महादेव कानर, श्री. प्रदिप खापरे, सौ.मिनल फेपडे, श्री.संतोष गावडे, पंकज गावडे, मनोहर कानर, दिपक सुर्वे, सुनिल कानर, नयना कानर, लक्ष्मी पाचकले, शर्मिला कानाल, दगडु जाधव, जयश्री कानर, आकाश कानर, संदिप शिगवण, संजय कानर, सतिश किंजळे, वैभव मांडवकर, प्रशांत कानर, लवू कानर, मनिष देसाई , श्री. रामगडे यांना देणगीदारांचा तसेच विशेष सहकार्य करणारे श्री. दत्ताराम कानर, सुरेश कानर, सुभाष कानर, सिताराम कानर, दिलीप शिगवण, जनार्दन सुर्वे, विलास कानर यांना गौरविण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक श्री.कैलास केळकर, नथुराम पाचकले, प्रकाश शिंदे, श्री.निरंजन बावस्कर यांना ही ग्रामस्थांच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.विलास कानर यांनी केले.