(मुंबई)
महाराष्ट्रात कातील गौतमी पाटीलची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तर गौतमी पाटीलचा कार्यक्रम व राडा हे जणू समीकरणच झाले आहे. राज्यातील राजकीय कार्यक्रम, बर्थ डे असो किंवा उद्घाटन कार्यक्रमसाठी गौतमी पाटीलला खास आमंत्रण दिलं जातं आहे. काही दिवसापूर्वी तर चक्क बैलासमोर गौतमीचा कार्यक्रम पार पडला.
गावात येणाऱ्या गौतमीला पाहण्यासाठी एका फॅनने दोन दिवस सुट्टी मागितल्याचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमीचा हा फॅन एसटी महामंडळाचा कर्मचारी असून सांगली जिल्ह्यातील तासगाव एसटी आगारात चालक म्हणून काम करत आहे.
व्हायरल होत असलेल्या सुट्टीच्या अर्जावर ११ मे २०२३ ही तारीख दिसत आहे. त्यानं २२ मे आणि २३ मे २०२३ रोजी सुट्टी हवी असल्याचं नमूद केलं आहे. २ दिवसांच्या सुट्टीची त्यानं विनंती केली आहे. आणि विशेष म्हणून सुट्टीचं कारण “गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवस रजा मिळावी” अस त्यानं मोठ्या ठळक अक्षरात लिहिलंय.