रत्नागिरी : जिल्हयात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून गेल्या वर्षाच्या ( जून 2020 ) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आतापर्यंत नोंदला गेला आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवडयांमध्ये जिल्हयात सरासरी ८०८.२ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिमी पावसाची नोंद झाली होती.
गेल्या ३ आठवडयात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात १११९.३ मिमी नोंदला गेला. मागील वर्षी या तालुक्यात याच कालावधीत ४६४.१२ मिमी पाऊस नोंदला गेला होता.
पावसाची तुलनात्मक आकडेवारी खाली प्रमाणे आहे. यात कंसातील आकडे मागील वर्षीचे आहेत. आकडे मिलिमिटर मध्ये आहेत.
मंडणगड ७२६ (४६३.३२), दापोली ५३०.६ (५६०.६९), खेड १११९.३ (४६४.१२), गुहागर ९३३.५ (६५८.७), चिपळूण ७५२.७ (५६७.०६), संगमेश्वर ८४७.८ (७२७.१), रत्नागिरी ९३१ (७१८.८), लांजा ७२५.६ (६६७.४) आणि राजापूर ६५८.५ (७६९.२५).
जिल्हयातील ९ तालुक्यांपैकी फक्त दापोली आणि राजापूर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी पाऊस आहे. मागील वर्षी जिल्हयात ६२१.८३ मिमी च्या सरासरीने ५५९६.४४मिमी पाऊस झाला. चालू वर्षात ८०८.०२ मिमी च्या सरासरीने ७२७२.२० मिमी अर्थात १६९५.७६ मिमी सरासरी पाऊस अधिक आहे.