(चिपळूण / ओंकार रेळेकर)
गुहागर तालुका कुंभार समाजाची स्थापना 1973 साली झाली आणि 2023 साली समाजाला 50 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने विद्यमान तालुका अध्यक्ष श्री अरविंद पालकर आणि सक्रिय कमिटी यांनी 14 मे 2023 रोजी सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे ठरविले. या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्मरणिका प्रकाशन सोहळा कुंभार समाज जिल्हाध्यक्ष श्री सुभाषराव गुडेकर आणि बबनराव जगदाळे (इंजिनिअर) यांच्या हस्ते पार पडला.
सुवर्ण महोत्सव निमित्ताने शालेय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून कौतुक केले. त्याच प्रमाणे समाजातील कीर्तनकार, मूर्तिकार आणि कुंभार क्रिया करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. काही दिवंगत समाज बांधवांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आले. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष श्री घनश्याम साळवी, सौ.लक्ष्मी माखजनकर ह.भ.प.,वासुदेव साळवी यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष श्री अरविंद पालकर यांना कार्यकारिणीने समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. ह.भ.प.गणपत महाराज हर्चिलकर यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री बबनराव जगदाळे(इंजि.) महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रसिका ताई खेडेकर, जिल्हाध्यक्ष श्री सुभाषराव गुडेकर,चिपळूण तालुकाध्यक्ष प्रकाशशेठ साळवी उपाध्यक्ष ह. भ.प.प्रकाश महाराज निवळकर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र शिरकर पतसंस्था संचालक श्री तुकाराम साळवी, जनार्दन मालवणकर, युवा उपाध्यक्ष श्री प्रदिप शिरकर सरपंच सौ. योगिता पालकर, कोकण विभाग उपाध्यक्ष श्री संतोष साळवी माजी अध्यक्ष श्री घनश्याम साळवी, माजी सचिव श्री राजाराम गुहागरकर तालुका उपाध्यक्ष श्री राजेंद्र समगीस्कर खजिनदार श्री मदन कुंभार,उपखजिनदार श्री महेश जामसुतकर ,जिल्हा युवा अध्यक्ष कु.दत्ता नरवणकर,विनायक गुहागरकर महिलाअध्यक्ष सौ.सुगंधा कुंभार सचिव, अक्षता साळवी, सौ अक्षता पालकर सचिव श्री चंद्रकांत साळवी श्री दत्ताराम समगिस्कर, समाजसेवक श्री मुकुंद बुडबाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री उमेश खैर, संपर्क प्रमुख श्री नाना पालकर, सचिव चंद्रकांत साळवी, गजानन पालकर चंद्रकांत दहिवलकर, सो.मीडिया अध्यक्ष प्रमोद साळवी श्री कृष्णा पालकर, दशरथ पालकर, विरेंद्र साळवी, तेजपाल पालकर, प्रशांत साळवी, मुकूंद बुडबाडकर, नाना साळवी, तुकाराम नादगावकर आदी समाजबांधवांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनिल गुडेकर यांनी केले.