(गुहागर / उमेश शिंदे)
गुहागर तालुक्यातील मौजे कुटगिरी येथे बी.एस.एन.एल चा टॉवर होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी वारंवार, शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न केले. ग्रामस्थांनी आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. त्यानंतर ग्रामस्थांच्या या मागणीला यश आले असून जिल्हा परिषद रत्नागिरी कडून बी.एस.एन.एल रत्नागिरी विभागाकडून टॉवर उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरी कडून बी.एस.एन.एल रत्नागिरी विभागाला मौजे कुटगिरी येथे जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्रजवळ नवीन बीएसएनएल 4G टॉवर उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. नवीन टॉवरमुळे मौजे कुटगिरीमधील वर्षानुवर्षांचा मोबाईल रेंजचा त्रास कायमचा मिटणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. स्व बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान, ग्रामपंचायत कुटगिरी – पाती यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी व बी.एस.एन.एल रत्नागिरी यांचे जाहीर आभार मानले आहेत.