(गुहागर)
मार्गताम्हाने येथे एस. टी. बस थांब्यावर जाताना रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थाला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने १५ वर्षीय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
ठोकर दिल्यानंतर दुचाकीस्वाराने तेथून पलायन केले. याप्रकरणी जखमी रूद्रेशची शिंदे याची आई सिद्धी रतिश शिंदे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये आपला मुलगा रूद्रेश हा मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठानच्या स्कूलमध्ये इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत आहे. सोमवारी १० वीची सराव परीक्षा होती. त्यामुळे तो सकाळी ९.३० वाजता जानवळे येथील बस थांब्यावर जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना गुहागरकडून येणाऱ्या नेव्ही ब्ल्यू रंगाच्या स्कुटीस्वाराने धडक दिली. यामध्ये त्याला मुका मार बसला असून कपाळाला व डाव्या पायाला लागले आहे.
अशाही परिस्थितीत परीक्षा असल्याने तो एसटीने स्कूलमध्ये गेला, परंतु स्कूलमध्ये त्याला जोराचे वेदना होऊ लागल्याने स्कूलमधून घरी पाठवण्यात आले.