(गुहागर)
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेलेले गुहागर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून (पुरवठा अधिकारी) प्रकाश खांडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक सुरू असताना खुर्चीवर बसलेले प्रकाश खांडेकर अचानक बेशुद्ध होऊन पडले. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धावपळ उडाली. गुहागर तहसील कार्यालयामध्ये अव्वल कारकून म्हणून ते काम करत होते. त्यांच्यावर पुरवठा अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार होता.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीसाठी ते उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचाराअगोदरच त्यांचे निधन झाले होते. ते मूळचे गुहागर तालुक्यातील मुंढे येथील रहिवासी आहेत.