(देवरुख / वार्ताहर)
गुहागर येथे घेण्यात आलेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत देवरुख मधील खेळाडूंचा वरचष्मा साधला आहे. स्पर्धेत येथील द्रोण हजारे याचा खुल्या गटात ‘उगवता तारा’ या पुरस्काराने सन्मान केला गेला.
या स्पर्धेत एकेरीत योगेश कोंडवीलकर यांनी येथीलच राहूल भस्मेवर २५\६ व २५\१२ ने पराभव करत विजेतेपद मिळवले. तर दुहेरीत देवरुखच्याच राहूल भस्मे व विजय कोंडवीलकर यांनी योगेश व संजय कोंडवीलकर यांच्यावर २५\१८ व २५\१२ने मात करुन विजय संपादन केला.
महिला गटात देवरुखच्याच गुंजन खवळे हिने निधी सप्रे हिच्यावर ९\२५,२५\५, व २५\५ ने मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. याचा बक्षिस वितरण समारंभ जिल्हा सचिव मिलींद साप्ते, सदस्य मोहन हजारे, पंच सचिन बंदरकर, मंदार दळवी व प्रदिप परचुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी देवरुखचा खेळाडू द्रोण हजारे याला खुल्या गटाचा ‘उगवता तारा’ या पुरस्काराने मान्यवरांनी सन्मानित केले. द्रोण व सराव यशस्वी खेळाडूंचे संगमेश्वर तालुका कॅरम असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.