(खेड / भरत निकम)
गुटखा विक्री करणारा दुसरा आरोपी गजाआड करण्यात येथील पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून ३,२९,०४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दुसऱ्या आरोपीचे नाव राजेंद्र सुभाष घोरपडे ( रा. वहाळ, ता.चिपळूण ) असे आहे.
दिनांक ३१/१२/२०२३ रोजी पोलीस शिपाई प्रकाश पवार, नेमणुक खेड पोलीस ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर-३८५/२०२३ भा.द.वि. कलम२७२,२७३.३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयात अटकेत असलेला आरोपी संतोष कृष्णा कासार (वय-४२ वर्षे, रा. मालघर महाडीकवाडी ता. चिपळूण, जि.रत्नागिरी ) याच्याकडे मिळुन आलेला गुटखा हा प्रतिबंधीत अन्नपदार्थ त्याने राजेंद्र सुभाष घोरपडे (रा. वहाळ ता. चिपळूण , जि. रत्नागिरी ) याचेकडुन आणल्याचे सांगितल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ वहाळ ता. चिपळूण या गावी जावुन राजेंद्र सुभाष घारेपडे याला ताब्यात घेतले. त्याचेकडुन सुमारे ३,००,०००/- रु. किंमतीचे बदामी रंगाची एल्टो के १० चारचाकी वाहन क्र एम एच ०१ ए एक्स ८८४२ व या वाहनात असलेला २९,०४०/- रुपये किंमतीचा गुटखा हा प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे हे करीत आहेत. आरोपी राजेंद्र सुभाष घोरपडे ( वय ४० वर्षे रा. वहाळ ता. चिपळूण,जि.रत्नागिरी ) यास दि. ०१/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली असुन त्याला येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. ०३/०१/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. हि कामगिरी खेड पोलीस ठाणे तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस शिपाई प्रकाश पवार, राहुल कोरे, कृष्णा बांगर, रुपेश जोगी यांच्या पथकाने पोलीस अधिक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर व पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
फोटो : गुटखा विक्री करणाऱ्या दुसऱ्या आरोपी समवेत खेड पोलीस स्थानकाचे पथक.