जर तुम्ही यूपीआय पेमेंट प्लॅटफाॅर्म फोन पेचे यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही आनंद वार्ता. गुगल पे यूजर्ससाठी यूपीआय पेमेंट करणे अजूनच सोप्पे झाले आहे. कंपनीने आपल्या अॅपवर यूपीआय लाईट फीचर लाईव्ह केले आहे. आता यूजर्स यूपीआय पिन न टाकता २०० रुपयांपर्यंतचे पेमेंट सहज करू शकतात. अलीकडे, पेटीएम आणि फोनपेने देखील ही सुविधा सुरू केली आहे.
यूपीआय लाइट सप्टेंबर २०२२ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कमी मूल्यांच्या व्यवहारांसाठी पेमेंट सुविधा जलद आणि सुलभ करण्यासाठी लॉन्च केले होते. यूपीआय लाईटच्या माध्यमातून तुम्ही एका क्लिकवर अनेक छोटे दैनंदिन व्यवहार सहज करता येणार आहेत.
UPI Lite एकदा लोड झाल्यानंतर वॉलेट यूजर्सना २०० रुपयांपर्यंतचे इंस्टंट व्यवहार करण्याची परवानगी देते. यात २०० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी पिनची आवश्यकता नाही. यामुळे पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि जलद होते. एका वेळी जास्तीत जास्त २ हजार रुपये अॅड करता येतील. UPI Lite द्वारे तुम्ही २४ तासांत जास्तीत जास्त ४ हजार रुपये खर्च करू शकतात.
गुगल पेमध्ये असे अॅक्टिव्ह करा यूपीआय लाईट
– गुगल पे अॅप ओपन करा
– अॅपच्या होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा.
– यानंतर UPI Lite Pay Pin Free वर क्लिक करा आणि सूचनांचे पालन करा.
– पैसे अॅड करण्यासाठी UPI Lite ला सपोर्ट करणारे बँक खाते निवडा.
– UPI पिन टाकताच UPI Lite खाते यशस्वीरित्या सक्रिय होईल.
– लक्षात ठेवा तुम्ही Google Pay वर फक्त एक UPI Lite खाते तयार करू शकता.