रत्नागिरी तालुक्यातील खंडाळानजीकच्या गुंबद ग्रामपंचायतीच्या हद्दिमध्ये कोरोनाची लागण दिसताच ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. उषा राजेश सावं . उपसरपंच मुनाफ वागले यानी आपल्या ग्रामपंचायत सदस्यांशी व गावातील ग्रामंस्त, ग्राम कृती दल यांच्याशी चर्चा करुन गावामध्ये सेनेटायजर फवारणी करण्याचे ठरवले. आजच्या कोरोना परिस्थितीत २ रुग्ण आढळून आल्याने गावात भितीचे वातावरण पसरले होते.
यावर उपाय योजना म्हणून ग्रामपंचायत गुंबदने गावच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकून पूर्ण गुंबद गाव सेनेटायजर केले. यामध्ये वाटद प्राथमिक आरोग्य केद्रांतले सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका , आशाताई ग्रामपंचायत कर्मचारी , गावातील प्रमुख कार्यकर्ते , जि.प.सदस्या सौ.ऋतूजा जाधव, सभापती पंचायत समिती रत्नागिरी सौ.संजना माने मँडम यांचे सर्वाचे सहकार्य होते. एक खंदा सदस्य म्हणून मुनाफ शेठ वागले यांच्या कडे पाहिले जाते. याची जाणीव ठेवून सर्वांना सोबत घेऊन मुनाफशेठ वागले, सरपंच सौ .उषा राजेश सावंत. श्री मुनाफशेठ वागले उपसरपंच, बानु खलफे सदस्या, मदिना मालीम सदस्या, अंकिता धातकर सदस्या व अनिल जाधव सदस्य याना घेऊन पूर्ण गाव सेनेटायजर करून निर्जंतूक केले