(क्रीडा)
पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला आहे. मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजी आणि शुभमन गिलच्या डबल सेंच्युरीच्या बळावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं. त्यामुळे टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र ब्रेसवेलने टीम इंडियाला जोरदार झोडपून काढले. टीम इंडिया हरते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. शार्दुलने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या. तर ब्रेसवेला 140 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. यासह टीम इंडियाने सामना 12 धावांनी जिंकला.
टीम इंडियाने न्यूझीलंडला 350 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. फिन ऍलेन 40 तर डेवोन कॉन्वे 10 धावा करून आऊट झाला होता. यानंतर मैदानात उतरलेला खेळाडू एकेरी दुहेरी धावसंख्या आऊट झाला होता. निकोलस 18, मिचेल 9, टॉम लॅथम 24, ग्लेन फिलीप 11 धावा करून आऊट झाले होते.
गिलने भारतासाठी त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. 149 चेंडूत 208 धावा केल्यानंतर तो 50 व्या षटकात बाद झाला. वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा तो 5वा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा, ईशान किशन, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी ही कामगिरी केली आहे.