[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पूणे, गार्डीयन गिरीप्रेमी संस्था पूणे व नेहरू माउंटेनिअरींग उत्तरकाशी यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या माऊंटेनिअरिंग अँण्ड अलाईड स्पोर्टस हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला होता. त्यासाठी एक प्रवेश परिक्षा घेऊन त्यातून पूर्ण देशातून ४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यातील ४४ जणांमध्ये रत्नागिरीतून श्री. राजेश नेने या गिर्यारोहकाची निवड करण्यात आली.
एक वर्षाचा अभ्यासक्रम दोन सेमीस्टरमधे विभागण्यात आला होता. पहिल्या सेमीस्टरमध्ये सह्याद्रीतील प्रशिक्षण होते. तर दुस-या सेमीस्टरला हिमालयातील अतिउंचीवरील प्रशिक्षण व आपत्कालातील प्रशिक्षण होते. या दोन्ही सेमीस्टरचे प्रशिक्षण हे अतिशय खडतर असे होते. या अभ्यासक्रमासाठी रत्नागिरीतून निवड झालेले श्री. राजेश नेने हे रत्नागिरीतील पहिलेच गिर्यारोहक ठरले. प्रत्येक सेमीस्टर झाल्यानंतर लेखी व प्रात्यक्षिक परिक्षा होऊन त्याचा निकाल जाहीर केला जात होता. तसेच दुस-या सेमीस्टरसाठी अतिउंचीवरील प्रशिक्षण म्हणजेच नेहरू माऊंटेनिअरींग इन्सिट्यूट येथील बेसिक माऊंटेनिअरींगचा कोर्स होता हाच टप्पा कोर्सचा फार महत्वाचा भाग होता आणि अवघड ही तितका होता, असे नेने यांनी सांगितले.
श्री. राजेश नेने यांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून ए ग्रेड मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. राजेश नेने हे रत्नागिरीतील माऊंटेनिअर्स असोसिएशन या नोंदणीकृत गिर्यारोहण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. श्री. नेने यांनी याआधीही सह्याद्रीतील अनेक ट्रेक केलेले आहेत. तसेच काही सुळक्यांवरील मोहीमेंचे यशस्वी आयोजन देखील केलेले आहे. तसेच हिमालयातील फ्रेंडशिप, पतालशू ही शिखरे व पदभ्रमण मोहीमांचे सुध्दा यशस्वी आयोजन केलेले आहे.