(मुंबई)
गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावी आणि हा प्रश्न लवकरात मार्गी लागावा म्हणून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एमएमआरडीए क्षेत्रात ३०० ते ४५० चौरस फूटांची ७५ हजार घरे गिरणी कामगारांना येत्या सहा महिने ते दोन वर्षात देण्यात येतील असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. या घरांच्या किंमती परवडणा-या असतील, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल दिले.
गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भात काल झालेल्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, तयार घरांची पहाणी कामगार संघटनांनी करावी. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना ही घरे पहाण्याची व्यवस्था येत्या चार दिवसात म्हाडाने करावी, असे निर्देश आम्ही म्हाडाला दिले आहेत. ही घरे गिरणी कामगरांच्या पसंतीस उतरली तर या घरांच्या किंमती कामगार संघटनाना विश्वासात घेऊन ठरवल्या जाव्यात आणि ती किंमत कमीत कमी असेल असे आश्वासनही त्यांनी दिले.