(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यांतील हातखंबा येथे नंदाई प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (२० ऑगस्ट २०२३) दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आजची तरुणाई व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर आहे त्यांना अशावेळी रोखले पाहिजे. वाडी- गावातमध्ये व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संविधान संवादक अमर पवार यांनी केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत सावंत, प्रमूख पाऊणे गटविकास अधिकारी जे पी जाधव, संविधान संवादक अमर पवार, विश्वसमता कलामंच संस्थापक मनोज जाधव, निवृत्त शिक्षक मनीष कांबळे, PSI नीलम जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्याशी संवाद साधताना अमर पवार म्हणाले, तरुणाईला सध्या मोबाईलचे व्यसन लागले आहे. मोबाईलचां वापर चुकीच्या पद्धतीने होत असून तरुण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत मोठी जबाबदारी पालकांची आहे. मोबाईलच्या माध्यमातून सर्व गोष्ठी प्रत्यक्ष मुलांपर्यंत पोचत असतात. मात्र यातून पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद कमी होतोय. प्रेम आणि आकर्षण या दोघांमधील फरक मुलांना पालकांनी समजून सांगितला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना त्या त्या वयोगटानुसार लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात बऱ्याच अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. कोणत्या वयात कोणती गोष्ट केली पाहिजे. हे योग्य वयात विद्यार्थ्यांनी स्वतः समजले पाहिजे. योग्य दिशेला पोहोचायच असेल तर काही गोष्ठी जाणीवपूर्वक टाळून आयुष्याचां मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घ्यावा.
यापुढे ते म्हणाले, अलीकडच्या काळात तंबाखू गुटखा दारू पिण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढत आहे. समाज व्यसनाधीन होत आहे. ज्या तरुणांच्या खांद्यावरती कुटुंबाची जबाबदारी आहे उद्या हेच तरुण व्यसनाधीन होत असतील तर आपण योग्य दिशेने वाटचाल करू का? हाच प्रश्न यानिमित्ताने पडतो.
बुद्धांचे तत्वज्ञान वाचणे आवश्यक
जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर तो मार्ग तथागत गौतम बुद्धांचां. बुद्धाला समजून घेण्यासाठी बुद्धाच तत्वज्ञान वाचणे आवश्यक आहे. बुद्ध केवळ एका समाजाचा नाही तर तो प्रत्येक माणसाचा आहे. बुद्ध धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. बुद्धाच्या तत्व प्रणालीचा अवलंब करून विद्यार्थीनी आपले उद्दिष्ट नीच्छित केले पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न करून यश मिळवता येईल. असे जाधव यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आवडणारे क्षेत्र निवडले पाहिजे
पी एस आय पदावर नुकत्याच नियुक्त झालेल्या नीलम जाधव विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, माझ्या वडिलांच्या वरिष्ठ एका साहेबांनी PSI परीक्षेबाबत सांगितले होते. सुरुवातीला इतका सर्व अभ्यास पाहून भीती वाटली. मात्र मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे लहानपणापासूनच ठरविले होते. त्यानुसार हा सर्व प्रवास सुरू होता. प्रयत्न केलात, मेहनत घेतली. तर याठिकाणी उपस्थित विद्यार्थी उद्या अधिकारी पदावर दिसतील. अधिकारीच प्रत्येकाने झालं पाहिजे असंही नाही तर आपले आवडणारे क्षेत्र निवडले पाहिजे. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांनी ध्येय निवडणे फार गरजेचे आहे. यामुळे त्याच मार्गाने मार्गक्रमण करता येते. आपल्या मनात स्वतःचे एक टार्गेट ठेवले पाहिजे. त्यानुसार अथक मेहनत करणे ही आज काळाची गरज बनली आहे. तरुण वयात नैराश्य येणे स्वाभाविक आहे मात्र त्याला घाबरुन न जाता धीराने सामोरे जाऊन त्यातूनच यश संपादन करता येते.
विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान
दरम्यान गुणवंत हुशार होतकरू विद्यार्थिनी श्रावणी संगम कांबळे हिला संघटनेच्या वतीने दत्तक घेण्यात आले. यासोबत बौद्ध समाजातील दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या एकूण २८ विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन अण्णा भाऊ साठे विचार पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विशेष १२ सत्कार करण्यात आले. यामध्ये विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धम्म बांधवांचे सत्कार करण्यात आले. यात मा. अनंतराव सावंत (अनंतराव सावंत (विशेष सामाजिक काम व सेवानिशीवाल) अनिल पवार (शैक्षणिक कार्य व सेवानिवृतीबद्दल), मा. मनीष कांबळे (विशेष शैक्षणिक कार्य व सेवानिवत्ती) P.S.I. मा. निलम जाधव (MPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याबदद्दल), श्रावणी संगम कांबळे ( २०२२ इस्त्रोसाठी निवड झाल्याबद्दल), तन्वी विद्याधर कांबळे ( ९०.८० % दहावी उत्तीर्ण पटवर्धनमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त) दीक्षा अनंत सावंत ( दहावी परीक्षेत ९०% गुण प्राप्त) यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली कांबळे हीने केले. तर आभार अनंत सावंत यांनी केले. यावेळी मिनल मनिष कांबळे, अर्जुन जाधव, सुभाष कांबळे, महेंद्र कांबळे, प्रकाश कदम, उमेश मोहिले, दिपक घाटविलकर, निशिगंधा घाटविलकर, सुहास पवार, प्रितम सावंत, धम्मंदिप सावंत, स्वरूप सांवत, अरूण जाधव, सुभाष आयरे आदी उपस्थित होते.