(रत्नागिरी)
तालुक्यातील गावखडी सुरुबन येथे मासे पकडण्यासाठी गेलल्या वृद्धाचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनंत प्रभाकर तोडणकर (६२, रा. भंडारवाडी-गावखडी, ता. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (१२ नोव्हेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडली.
वृद्ध तोडणकर रविवारी सकाळी नऊच्या सुमारास जाळे घेऊन गावखडी येथील सुरुबन परिसरात मासे पागण्यासाठी गेले होते. ते सकाळी अकरापर्यंत घरी परतले नाही म्हणून घरच्यांसह ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी सुरुबन येथे ते मृतावस्थेत आढळले. तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.