(रत्नागिरी)
तालुक्यातील गावखडी येथे सर्पदंश झालेल्या वृध्दाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वा. घडली.
महादेव संभाजी पड्यार (वय ६९, रा. गावखडी गावकोंड, रत्नागिरी) असे सर्पदंश झालेल्या वृध्दाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ते शेतात काम करत असताना त्यांना सर्पदंश झाला. ही बाब तेथील इतर ग्रामस्थांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी पड्यार यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.