(गावखडी / दिनेश पेटकर)
रत्नागिरीत तालुक्यातील गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सवानिमित्त श्रीदेव रामेश्वरा च्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.
श्रीदेव रामेश्वर उत्सव मंडळाच्या गावखडी च्या वतीने ग्रामस्थ भाविक यांच्या सहकार्यातून भक्तिभावाने मांगल्य, एकोप्याने मोठ्या दिमाखात गावखडी रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. आज महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा खांबांची आणि एकवीस पायली तांदळाची महापूजा बांधण्यात आली आहे. ही तांदळाने बांधलेली महापूजा हे भक्तिगणांचे आकर्षणच असते. आज सकाळपासून महिलांसाठी हळदीकुंकू, देवाचा खिचडी प्रसाद, तीर्थप्रसाद भाविकांना रामेश्वर मंदिरात दिला जात आहे.
फोटो : गावखडी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अकरा खांबांची आणि एकवीस पायली तांदळाची महापूजा बांधण्यात आली आहेत पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी भाविकांची गर्दी रांग
छायाचित्र : दिनेश अनंत पेटकर, गावखडी