(रत्नागिरी)
तालुक्यातील गावखडी मोहल्ला येथे मारहाण केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावल़ी. नुकसान भरपाई म्हणून 5 हजार रूपयांचा दंड व एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर न्यायालयाने आरोपीला मुक्त केल़े. एजाज अब्दुल रज्जाक दर्वेश (38, ऱा. गावखडी रत्नागिरी) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आह़े.
मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा. सरकारी पक्षाकडून ऍड़ विद्यानंद जोग यांनी काम पाहिल़े. खटल्यातील माहितीनुसार, 31 मे 2015 रोजी सायंकाळी 7.30 वा. गावखडी मोहल्ला येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होत़े. यावेळी झालेल्या वादातून एजाज दर्वेश याने अन्वर आयुब पेजे (ऱा गावखडी मोहल्ला) याला हाताच्या थापटाने, लाथा-बुक्क्यांनी व लाकडी बांबूने याला मारहाण केली, अशी तकार अन्वर यांचे भाऊ इक्बाल आयुब पेजे यांनी पूर्णगड पोलिसांत दाखल केली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी एजाज याच्याविरूद्ध भादंवि कलम 323 व 324 नुसार गुन्हा दाखल केल़ा. पूर्णगड पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस हेडकॉन्स्टेबल धुमासकर यांनी तपास करून एजाज याच्याविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े. एजाज याच्याविरूद्धचे आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावल़ी. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून पूर्णगड पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल महेश मूरकर यांनी काम पाहिल़े.