(भोपाळ)
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत वेगवेगळे प्रकार दिसून येत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यापासून, तर आंदोलन करण्यापर्यंत आणि उमेदवारी दाखल करण्यासाठी आता प्राण्यांचाही वापर होत असल्याचे दिसत आहे. बर्हाणपूर येथे एका अपक्ष उमेदवाराने चक्क गाढवावर बसून उपविभागीय कार्यालयात अर्ज सादर केला. प्रियांकसिंह ठाकूर असे या संभाव्य आमदाराचे नाव असून, भाजपा आणि काँग्रेसने जनतेला गाढव बनविल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नागदा खाचरोद विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोर उमेदवार लोकेंद्र मेहता यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह बैलगाडीतून येऊन अर्ज प्रशासनाकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या सं‘येत समर्थक होते.
अधिकार्यांसमोर 10 हजार नाणी
व्यवसायाने वकील असलेले संदीप नायक हे जनता दल युनायटेडच्या वतीने कटनी जिल्ह्यातील मुडवारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यांनी कटनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. परंतु, शुल्काच्या रूपात त्यांनी अधिकार्यांच्या टेबलवर एक-एक रुपयाची चक्क 10 हजार नाणी ठेवली. यानंतर चार कर्मचार्यांनी एका तासात ही रक्कम मोजून पूर्ण केली.