(मुंबई)
लहान मुलांचे संगोपन निकोप होण्यासाठी त्यांच्या आहारात दूध महत्त्वाची भूमिका बजावत असते. दूधामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, कॅल्शियम आणि ड जीवनसत्व असते. बहुतेक प्राण्यांच्या दूधामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हे घटक आढळतात. आपल्याकडे प्रामुख्याने गाय, म्हैशीचे तर काही प्रमाणात शेळी, बकरीचेही दूध मुलांना दिले जाते. पण दुधाचा स्त्रोत खरोखरच महत्त्वाचा गाढवाचे दूध मानले जाते. धारावी परीसरात असेच गाढावाचे दूध चक्क प्रति चमचा 50 रुपये दराने विकले जात आहे. धक्कादयक म्हणजे एक व्यक्ती त्याच्यासोबतचे मादी गाढव म्हणजेच गाढवीण घेऊन धारावीमध्ये दारोदार फिरत आहे आणि तिच्या दुधाची विक्री करत आहे.
दुधाचे महत्त्व सांगून पैसे उकळण्याचा प्रकार
दक्षिण भारतात गाढवाच्या दूधाला आवश्यक पोषण आहारासाठी प्रमुख स्त्रोत मानले जाते. मात्र, धारावीमध्ये विक्री होणारे गाढवाचे दूध हे रोगप्रतिकारक असल्याचा दावा केला जातो आहे. टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, गाढव घेऊन दारोदारी फिरणारा व्यक्ती दावा करत आहे की, त्याच्या गाढवीणीचे नाव जेनी असे आहे. जेनीने दिलेले दूध हे लहान मुलांचा सर्दी, खोकला ताप, डोळ्यावरील ताण, दात आणि शरीराचा अशक्तपणा, अस्थमा आदी प्रकार दूर करतो आणि मुलांना तंदुरुस्त बनवतो. मुलांच्या गुप्तेंद्रीयात असलेली समस्याही हे दूध दूर करते.
धक्कादायक बाब अशी की, मुलांच्या माता आणि घरातील इतर पालक गाढवाच्या दूध विक्रीस हातभार लावत आहेत. गाढव मालकाने केलेल्या दाव्यावर विश्वास ठेऊन प्रति चमचा 50 रुपये दराने ते आपल्या मुलांना दूध पाजत आहेत. मुंबई महापालिकेचे डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मात्र सांगतात की, गाढवाचे दूध हा पोषण आहारासाठी एक महत्त्वाचा स्त्रोत ठरु शकतो. तसेच, त्याची चव आणि स्वाद अनेकांना आवडू शकतो. ते इतर दूधांप्रमाणेच सामान्य आहे. मात्र, असे असले तरी ते लहान वयाच्या आणि नवजात बालकांना थेट देता येत नाही. असे दूध देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या दूध अथवा अहारामुळे मुलांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
गाढवाच्या दूधात प्रोटीनची मात्रा कमी आणि चरबी अधिक असते. त्यामुळे गाईच्या दूधाच्या तुलनेत मुलांसाठी हा एक सदृढ आहार ठरु शकतो. गायीच्या दूधात अधिक प्रथिने असतात तसेच त्यातील काही घटक मुलांना अॅलर्जी निर्माण करतात. पण, असे असले तरी, कोणत्याही प्राण्याचे कच्चे दूध मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.