(मुंबई)
टायर फुटणे ही नैसर्गिक क्रिया म्हणता येणार नाही. हा मानवी निष्काळजीपणा आहे. त्यामुळे विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्यापासून मुक्त करता येणार नाही. विमा कंपनीने नुकसान भरपाई करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाने म्हटले की, टायर फुटण्याची अनेक कारणे आहेत. जसे की जास्त वेग, कमी वारा, जास्त वारा किंवा सेकंड हँड टायर आणि तापमान. प्रवास करण्यापूर्वी गाडीच्या चालकाने टायर्सची स्थिती तपासली पाहिजे. टायर फुटणे ही नैसर्गिक क्रिया म्हणता येणार नाही. हा मानवी निष्काळजीपणा आहे. त्यामुळे विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्यापासून मुक्त करता येणार नाही. विमा कंपनीने नुकसान भरपाई करावी.
कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले होते की, मृत व्यक्ती हा कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता. मात्र विमा कंपनीचे म्हणणे आहे की, नुकसान भरपाईची रक्कम जास्त आहे. टायर फुटणे हे ईश्वराचे कृत्य आहे. उच्च न्यायालयाने हे अपील स्वीकारण्यास नकार दिला. न्यायमुर्तींनी सांगितलं की, शब्दकोषातील ऍक्ट ऑफ गॉडचा अर्थ ऑपरेशनमध्ये अनियंत्रित नैसर्गिक शक्तींचे उदाहरण आहे. या घटनेतील टायर फुटणे ही देवाची कृती म्हणता येणार नाही. हा मानवी निष्काळजीपणा आहे.
मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच एका रस्ते अपघाताच्या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने वाहनाचे टायर फुटणे हे देवाचे कृत्य नसून मानवी निष्काळजीपणा असल्याचे निरीक्षण नोंदवत विमा कंपनीने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळत नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचे आदेश दिले.