(रत्नागिरी)
रत्नागिरी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पारस नगर, खेडशी तलाठी कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गांजा विक्रीसाठी बसलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने ताब्यात घेतले. अनिल मान बहादूर गुरूंग ( वय २३, रा. कारंवाचीवाडी, मूळ नेपाळ) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या नेपाळी तरुणाकडून १५.७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८ व २७ अन्वये ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार शहा, यांच्या मार्गर्शनाखाली पप्या बोरकर, शांताराम झोरे, बाळू पालकर, प्रविण खांबे, चालक श्री. कांबळे यांनी केली. स्थानिक गु्न्हे शाखेच्या टिमचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले.