(संगमेश्वर)
बँकेत गहाण ठेवण्यासाठी दिलेले दागिने एका महिलेने लंपास केल्याची घटना कातळ मोहल्ला – कोंडिवरे (ता. संगमेश्वर) येथे घडली. या दागिन्यांची किंमत २ लाख ६० हजार इतकी असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हा प्रकार मे २०२० ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत घडला. कातळ मोहल्ला कोंडिवरे येथील एका – महिलेच्या नातेवाईक महिलेला पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी आपल्याकडील २ लाख ६० हजारांचे साडेआठ तोळ्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यासाठी दिले होते. मात्र, त्या महिलेने हे दागिने परत केले नाहीत. तिची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे