(लांजा / प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लांजा अंतर्गत ग्रामशाखा गवाणे येथे रविवारी (दि.१५ ऑक्टोबर २०२३) वर्षावास पुष्प विसावे हा कार्यक्रम संपन्न झाला. संपूर्ण भारतभर आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास कार्यक्रम राबविले जात असतात. त्याच पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यात अतिशय उत्साहात वार्षावास कार्यक्रम सुरु आहेत. लांजा तालुक्यातील गवाणे येथे प्रबुद्ध बुद्ध विहारात वर्षावास पुष्प -विसावे हा कार्यक्रम दताराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दत्ताराम कांबळे यांनी भूषवले. त्यांच्या हस्ते दीप् प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रवचनकार अनंत सावंत(गुरुजी), आर. बी. कांबळे व बबन कांबळे देवधेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रवचनकार अनंत सावंत गुरुजी यांनी बौद्धधम्म आणि मानवता या विषयावर मौलिक विचार व्यक्त केले. त्यांनी वास्तविक जीवन आणि आचरण याबाबत उदाहरणे व दाखले देत मानवता हाच बौद्ध धम्माचा पाया आहे. पंचशील , २२ प्रतिज्ञा, यांचे तंतोतंत पालन करणे आणि माणसाने माणसासारखे वागणे म्हणजे बौद्ध धम्म होय असे सांगून आपल्या ओजस्वी वाणीने मंत्रमुग्ध केलेल्या उपासक उपासिका आणि बालकांना शुभेच्छा देऊन प्रवचनाची सांगता केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताराम कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रबुद्ध बुद्ध विहारात प्रवचनासाठी उपासक उपासिका व बालकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. प्रवचन ऐकण्यास तालुक्यातून विविध गावातील धम्मबांधव उपस्थित होते . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲङ. डॉ. प्रभाकर शिंगये यांनी केले. तर दिनेश जयराम कांबळे यांनी ग्रामशाखेच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त केले