( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी शहरातील भरवस्तीत वृद्धाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवार २६ डिसेंबर रोजी दुपारी २ वा. सुमारास चिरायू हॉस्पिटलमध्ये घडली. या प्रकरणी महिताप अब्दुल हमीद साखरकर (रा. शिरगाव, रत्नागिरी) विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद इम्तियाज अब्दुल सत्तार पटेल (६२, रा. रहेबार मोहल्ला साखरतर, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे दिली आहे.
सोमवारी इम्तियाज पटेल यांचे नातेवाईक अन्वर पटेल यांच्या मुलाचा अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन सिटीस्कॅन करण्यासाठी चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी पटेल यांच्या अन्य नातेवाईकांनी गर्दी केल्याचे पाहून इम्तियाज पटेल यांनी गर्दी कमी करा असे त्यांना सांगितले. याचा राग आल्याने महिताप साखरकरने इम्तियाज पटेल यांच्या शर्टची कॉलर पकडून गाडीची चावी असलेल्या फाईटने आणि लाथांनी मारहाण केली. महिताप अब्दुल हमीद साखरकर विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.