(रत्नागिरी)
कोकण मार्गावरून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस – कोचुवेली गरीब रथ साप्ताहिक एक्स्प्रेससह लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेससह कर्नाटकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ६ महिन्यांसाठी १ थांबा वाढवण्यात आला आहे. त्यानुसार १२२०१ / १२२०२ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस – कोचुवेली गरीबरथ एक्स्प्रेस गुरूवारपासून अंकोला रेल्वेस्थानकात प्रायोगिक तत्त्वावर ६ महिन्यांसाठी थांबणार आहे.
यापूर्वीही गरीब रथ एक्सप्रेस मुकांबिका रोड – बेंदूर स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर ७ मार्चपासून ६ महिन्यांसाठी अतिरिक्त थांबा वाढवला आहे. या पाठोपाठ १६३४५ / १६३४६ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेसलाही गुरूवारपासून भटकळ स्थानकात ६ महिन्यांसाठी अतिरिक्त थांबा वाढवण्यात आला आहे. यापूर्वीही नेत्रावती एक्सप्रेसला कुंदापुरा रेल्वेस्थानकात अतिरिक्त थांबा वाढवण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळूर मत्स्यगंधा एक्स्प्रेसलाही ३ मार्चपासून बारकूर रेल्वेस्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.