(जीवन साधना)
राशिचक्रातील चिन्हे लोकांचे स्वभाव, गुण आणि व्यक्तिमत्व सांगतात. हिंदू धर्मातील लोक जन्मकुंडलीवर खूप विश्वास ठेवतात. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य नऊ ग्रहांपैकी राजा मानला जातो. ही सूर्य ग्रहाची राशी आहे. सिंह राशीचा देखील हनुमानजींच्या आवडत्या राशींमध्ये समावेश आहे. या राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते. या लोकांनी मंगळवारी पूजा केली तर त्यांची आर्थिक अडचण दूर होते. सिंह राशीचा स्वामी साक्षात सूर्य असल्याने सहाजिकच या राशीच्या गुणधर्मांमध्ये तेजस्वी, ताकदवान, प्रतिष्ठा, आत्मविश्वास, स्वाभिमान, ऐट आणि धैर्य हे येतातच. या राशीच्या व्यक्तींचा मेंदू मॉडिफाइड असतो. दिसायला डोकं जरासं मोठं. सिंह राशीच्या व्यक्तींचा चेहरा, डोळे रेखीव असतात. डोळ्यात चमक असते आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक असतं. त्यांचा आवाज खर्जातला किंवा धीरगंभीर असतो आणि त्यामुळे त्यांना ऐकणं सुखकर असतं.
सिंह – मा, मी, मू, मी, मो, ता, ती, ते, ते
राशीचे स्वरूप – सिंहासारखे
राशीचा स्वामी – सूर्य
मैत्री – सिंह राशीच्या व्यक्ती मेष, कर्क, मिथुन, वृश्चिक, धनु, कन्या आणि मीन राशीच्या लोकांशी छान मैत्री करू शकतात.
शत्रू – तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांचा यांना धोका वाटतो
लकी रंग – सोनेरी, लाल आणि क्रीम कलर
भाग्यदिन – रविवार
लाभणारं रत्न – माणिक
सिंह राशीचे लोक चांगले नेते असतात. ते जन्मापासूनच नेतृत्व अप्रतिम क्षमतेने समृद्ध असतात. सिंह राशीचे लोक राजासारखे जीवन जगतात. त्यांच्याकडे आश्चर्यकारक धैर्य आणि ऊर्जा असते. अहंकार आणि राग या त्यांच्या नकारात्मक बाजू असल्यातरी या राशीचा स्वामी सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, त्यामुळे या लोकांनाही राजासारखे जीवन जगणे आवडते. ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ असे हे लोक खूप प्रामाणिक आणि आदर्शवादी असतात. परंतु जेव्हा कोणी त्यांच्या आदर्शांना दुखावण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतःवरील नियंत्रण गमावतात. रागीट आणि हट्टी स्वभाव ही त्यांची कमजोरी आहे. हे लोक दबावाखाली देखील आक्रमक होऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांना एकूणच जीवनाकडून खूप अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा प्रेमात अपयश येतं. या राशीचे लोक आशावादी असतात आणि महत्त्वाकांक्षीसुद्धा. ते त्यांच काम खूप नेटाने करतात आणि कधी कुणाचा दुःस्वास, तिरस्कार करत नाहीत. कट्टर राहूनही काम पूर्णत्वास नेण्याचे कौशल्य यांच्या अंगी असते. हुकुमाने इतरांकडून काम करुन घेण्याची यांना सवय असते. कर्क राशीसारखे भावनेवर भर न देता कर्तव्यासाठी कठोर वागतात.
या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. पैसा त्यांच्या हातात अजिबात राहत नाही. जरी ते पैशाची उधळपट्टी करत असले तरी पैसे देखील खूप मिळवतात. मात्र अनेकवेळा त्यांचे मित्र आणि नातेवाईकांशी पैशाच्या व्यवहारावरून वादही होतात. त्यांचा स्वभाव महत्त्वाकांक्षी असतो. तथापि, ते अत्यंत स्वच्छ हृदयाचे आणि उत्कट व्यक्तिमत्त्वाने समृद्ध असतात. आत्मत्याग, स्वातंत्र्य आणि मौलिकता टिकवून ठेवण्याची इच्छा हे या राशीचे मुख्य गुण मानले जातात. हे लोक खूप धैर्यवान आणि दृढनिश्चयी असतात. एकदा का यांनी एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला की ते पूर्ण करू करूनच सोडतात. हे लोक स्वभावाने प्रामाणिक असतात, इतरांच्या यशाचा ते मत्सर करत नाहीत. त्यांना भौतिक सुखे आवडतात. आराम, सिनेमा पाहणे, काही वस्तू जमवणे, छान छान कपडे घालणे आणि छानचौकी या सिंह राशीच्या व्यक्तींचे सर्वांत आवडते छंद असतात. सिंह राशीचे लोक स्वतःच्या अतिविचारी स्वभावामुळेच कधीकधी संकट ओढवून घेतात. कारण वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते बराच वेळ पुढचा-मागचा विचार करण्यातच घालवतात.
सिंहेच्या लोकांना साहित्य, पत्रकारिता, राजकारण, विज्ञान, ज्योतिषशास्त्र या विषयातही यश मिळू शकतं. याशिवाय धातू आणि धातू- खड्यांशी संबंधित व्यवसायांमध्ये त्यांना यश मिळू शकतं. सिंह राशीसाठी प्रेम हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. खूप अवघड परिस्थितीचा सामना केल्यानंतरच त्यांना प्रेमाचा अनुभव येतो. सिंह राशीच्या लोकांचं लग्न जमण्यात अडचणी येण्याची शक्यता असते. पण एकदा लग्नगाठ बांधली गेली की नशीब उजळतं. सिंह राशीच्या व्यक्ती आईच्या खूप जवळ असतात.
सिंह राशी थोडक्यात:
- सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. ती पूर्व दिशेची स्वामी आहे. यांचा स्वभाव मेष राशीसारखाच आहे, पण त्यात उदारता आणि स्वातंत्र्य जास्त आढळते आणि या राशीचा घटक अग्नी आहे.
- या अंतर्गत मघा नक्षत्राचे चार चरण, पूर्वा फाल्गुनीचे चार चरण आणि उत्तरा फाल्गुनीचे पहिले चरण येतात.
- केतू-मंगळामुळे व्यक्तीमध्ये मानसिक उत्साह निर्माण होतो. केतू-शुक्र, जे सुंदरता आणि सौंदर्याकडे आकर्षण वाढवतात.
- केतू-बुध मनात कल्पनारम्य विचार येण्यासाठी परिस्थिती निर्माण करतात. तर चंद्र-केतू राशीत कल्पनाशक्ती विकसित करतात. शुक्र-सूर्य व्यक्तीला नैसर्गिक प्रवृत्तींकडे घेऊन जातात.
- अशा व्यक्तीना सौंदर्याचे आकर्षण व स्वतःबद्दल स्वातंत्र्याची भावना असते आणि ते सहसा कोणाचेही ऐकत नाहीत.
- जातक, पित्त आणि वायू विकारांनी ग्रस्त असलेले हे लोक रसाळ पदार्थांचे शौकीन असतात. त्यांना जड अन्न कमी खाण्याची आणि खूप फिरण्याची सवय आहे.
- भारदस्त छातीमुळे त्यांच्यात हिम्मत खूप असते आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा हे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही घाबरत नाहीत.
- अशा व्यक्ती आयुष्याच्या पहिल्या टप्प्यात आनंदी असतात, दुसऱ्या टप्प्यात दुःखी आणि शेवटच्या टप्प्यात पूर्णपणे आनंदी असतात असा यांचा जीवनप्रवास असतो.
- सिंह राशीचे लोक प्रत्येक काम राजेशाही पद्धतीने करतात, जसे की राजेशाही विचार करणे, राजेशाही पद्धतीने वागणे, राहणे. यांचे शाही पद्धतीनेच खाणे-पिणे असते.
- या राशीच्या लोकांची जीभ पक्की असते. या व्यक्ती जे आवडते तेच खाणे पसंत करते, नाहीतर यांना उपाशी राहायला आवडते. यांना फक्त आदेश कसे द्यायचे हे माहित असते, ते कोणाच्याही आदेशांना सहन करू शकत नाहीत.
- ही व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करेल ते प्रेम मरेपर्यंत पाळते, स्वतःला त्याच्या आयुष्याच्या जोडीदारासाठी पूर्णपणे समर्पित ठेवते. या राशीच्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणी अनोळखी आलेले आवडत नाही.
- अतिशय मेहनती हे लोक पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. सोने, पितळ आणि हिरे-दागिन्यांचा व्यवसाय त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर सरकारी नोकरीत अशा व्यक्ती उच्च स्थानी असतात.
- या राशीचे लोक शरीराने मजबूत असतात. तर नृत्य ही त्यांची खासियत असते, या राशीचे बहुतेक लोक एकतर पूर्णपणे निरोगी राहतात किंवा आयुष्यभर आजारी असतात, असे दोनच प्रकार यांचेमध्ये आढळतात.
- सिंह राशीच्या मुलींचा स्वभाव कठोर असतो. या मुलींना कोणाच्याही अधीन राहणे आवडत नाही. नेतृत्व करण्यासाठी त्या कायम सिद्ध असतात. सिंह राशीच्या मुली प्रत्येक कामात इतर राशीच्या मुलींपेक्षा पुढे असतात.
- सिंह राशीच्या मुलींचा स्वभाव त्यांच्या पतीच्या बाबतीत क्रूर असतो आणि त्या पतीचे ऐकत नाहीत. उलट पती त्यांना विचारल्यावरच काही काम करत असतात.
- या राशीच्या मुलींचा स्वभाव इतरांसाठी इतका चांगला असतो की, अनेक लोक आपोआप त्यांच्या कामावर प्रभावित होऊन आकर्षित होतात.
- सामान्यतः या राशीचे लोक क्रोधी स्वभावाचे असतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर रागात येतात, परंतु शांतही लवकर होतात.
- या राशीचे लोक प्रत्येक काम शाही पद्धतीने करतात, म्हणजेच विचार शाही, आहार शाही आणि राहणीमानही शाही.
- हे लोक वचनबद्ध असतात. एखाद्याला दिलेला शब्द कधीही मोडत नाहीत.
- जर हे लोक सरकारी नोकरी करत असतील तर लाभ जास्त होऊ शकतो. व्यक्तीच्या वाणी आणि वागणुकीमध्ये शालीनता आढळून येते.
- या राशीचे लोक सुगठीत शरीराचे धनी असतात. नृत्य करणे ही एक यांची विशेषता असते.
- ज्या वातावरण हे राहण्यास इच्छुक आहेत, ते यांना मिळाले नाही तर दुःखी होतात.
- पाठीचे आजार किंवा हृदय रोग, छातीत धडधड होणे, उन्हाळी लागणे या आजारांमुळे हे लोक त्रस्त राहू शकतात. पित्त आणि संधिवात रोगापासूनही त्रस्त असतात.
(Source : विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/धार्मिक श्रद्धा-शास्त्रातील संकलित माहिती)