(जीवन साधना)
ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र ज्या स्थानावर बसलेला असतो त्या स्थानाला व्यक्तीची राशी मानली जाते. राशीवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे गुण-दोष ओळखता येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी सांगितल्या गेल्या आहेत. यातील आज आपण कर्क राशीविषयी जाणून घेऊया, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव इतर राशींपेक्षा वेगळा असतो. कोणत्याही व्यक्तीची राशी किंवा कुंडली पाहून त्याचा स्वभाव सांगता येतो. मानवी जीवनात घडणार्या बहुतेक घटना मोठ्या प्रमाणात या राशीनुसार ठरतात असे मानले जाते.
कर्क – ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
राशिचक्र स्वरूप – खेकडा
राशीचा स्वामी – चंद्र.
भाग्यशाली अंक – 2 व 7 अंक भाग्यशाली त्याप्रमाणे 2 ची साखळी 2, 11, 20, 29, 38 47 तसेच 7 ची साखळी 7, 16, 25, 34, 43, 52, 61, 70 आदि शुभ असतात.
भाग्यशाली दिवस – सोमवार तसेच बुधवार व रविवार पण शुभ असतात
लकी रंग – पांढरा, फिकट निळा आणि क्रीम कलर
रत्न – मोती
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ती उत्तर दिशेची स्वामी आहे. या व्यक्तींचा स्वभाव लाजाळूपणा, ऐहिक, प्रगतीसाठी झटणारा आणि वेळेनुसार चालणारा असतो. या राशीच्या लोकांना शुक्रवारचा उपवास व शंकराची उपासना करणे लाभदायक असते. चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने वाढतो कलेकलेने कमी होतो, अगदी त्याप्रमाणे या व्यक्ती कधी कधी सकारात्मक असतात तर कधी अचानकच देशाच्या कर्जाचा बोजा आपल्या एकटयावरच आहे की काय, असे नर्वस होतात. जशी अमवास्या पोर्णिमा अशी चंद्राची स्थिती असते, तशी यांच्या मनाची अवस्था असते.
कर्क राशीचा स्वभाव स्वावलंबी, प्रामाणिक आणि न झुकणारा असतो. कर्क राशीच्या लोकांना न्याय मिळवणे किंवा इतरांना न्याय देणं आवडतं. या राशीच्या लोकांची स्मरणशक्तीही खूप तीक्ष्ण असते. याशिवाय कर्क राशीचे लोक संवेदनशील आणि भावनिक असतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी आसक्ती असते. तसेच हे लोक त्यांच्या जीवनसाथीशी एकनिष्ठ असतात. आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचे शब्दात कौतुक कसे करावे हे त्यांना कळत नाही. त्यांच्यासाठी त्यांची मुले आणि कुटुंबातील सदस्य सर्वात महत्त्वाचे असतात. कर्क राशीचे लोक मैत्रीमध्येही विश्वासू असतात. ते साधे आणि दयाळू स्वभावाचे मानले जातात. हे लोक आपल्या मित्रांसोबत मनातील सर्वात खोल गोष्टी शेअर करतात. या राशीच्या व्यक्ती सामाजिक उपक्रमात सक्रीय भाग घेतात आणि देशभक्तही असतात.
कर्क राशीच्या महिलांबद्दल बोलायचे झाल्यास कर्क राशीच्या महिलांना संवेदनशील आणि भावनिक मानले जाते, परंतु या स्त्रिया आपल्या भावनांबद्दल सावध असल्यामुळे पटकन प्रेमात पडत नाहीत. दुसरीकडे, कर्क राशीच्या स्त्रिया जेव्हा नातेसंबंधात पडतात तेव्हा त्या त्या नात्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात. या राशीच्या महिलांचे मन जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
कर्क राशिच्या लोकांनी आपल्याच राशिच्या व्यक्तीशी विवाह करावा. या राशिच्या लोकांना स्वतंत्र राहणे अधिक आवडते. यांना जोडीदार प्रिय असतो मात्र पत्नीच्या हाताखाली राहायला वा तिला चांगले वाटेल म्हणुन काही करायचे असे करणे यांना अजिबात आवडत नाही. त्यांचा जीवनसाथीने त्यांच्या कामात हस्तक्षप केलेला त्यांना आवडत नाही. हे फार हट्टी स्वभावाचे असतात. त्यामुळे यांना अनेकवेळा त्रास सहन करावा लागतो. व्यर्थ बडबळ त्यांना आवडत नाही. वृश्चिक किंवा मीन राशिंच्या व्यक्तीशी विवाह करणे यांच्यासाठी फायद्याचे राहील.
कर्क राशिवाले लोक कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात सफलतापूर्वक धनप्राप्ती करू शकता. यांचा कठोर मानसिक श्रम करण्यावर विश्वास असतो व यांची व्यक्तीगत रूची कलात्मक वस्तुंचा संग्रह करण्यात असते. या व्यक्ती चांगले फोटोग्राफर, कलाकार, केमिस्ट ज्योतिषर् विद्वान व कादंबरीकार बनू शकतात. पर्यटन व किरकोळ व्यापारात देखील यांना सफलता मिळेल. कर्क राशिवाले लोक उत्तरदायित्वांचा सम्मान करतात व त्यांचे पालन करतात. कर्क राशिचे लोकांना आपल्या पती किंवा पत्नी कडून प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता असते. मात्र यात त्यांना भांडल्याशिवाय प्रॉपर्टी मिळत नाही. धन दौलत मिळायला लागल्यानंतर हे अति महत्त्वाकांक्षी बनतात. पण हा मार्ग म्हणावा तितका सोपा नाही. अत्यंत कठोर परिश्रमानंतरच यांना धनप्राप्ती होते. यांनी जुगार,सट्टा, रेस आदी टाळावे कारण यात आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. यांना 14, 26 तसेच 30 व्या वर्षी मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
हे लोक आपल्या धनसंपत्तीबाबत कधीच दुसर्याशी बोलत नाहीत. कर्क राशिचे लोक हे अत्यंत संवेदनशील असतात भावनात्मक दृष्ट्या स्वत:ला ते असुरक्षित मानतात. विचार करण्याची शक्ती यांच्यात फार कमी असते. हे लवकर एकाग्र होऊ शकत नाहीत. हे वंशवादी आग्रहशाली असतात. लोकांना सतत मदत करणारे असे हे लोक असतात. या व्यक्ती शिक्षण,लेखन, चित्रकला, जाहिरात, विपणन क्षेत्रात चांगले कार्य करू शकतात, तसेच व्यवसाय व वाणिज्य क्षेत्रातील विशषत: आयात निर्यात क्षेत्रात चांगले कार्य करतात.
कर्क राशिच्या लोकांसाठी पांढरा व फिक्कट निळा रंग भाग्यशाली असतो. या रंगाचे कपडे घातल्याने मानसिक शांति मिळते. खिशात नेहमी पांढर्या रंगाचा रूमाल ठेवावां त्यानी आपल्याला लाभ होईल. आपण घालत असलेल्या कपड्यांमध्ये कोणत्याही स्वरूपात पांढर्या रंगाचा समावेश असावा.
कर्क राशिवाल्याची मैत्री वृषभ,मीन व कन्या सूर्यराशीच्या व्यक्तींबरोबर प्रेम फळते फूलते. या राशींच्या व्यक्ती मित्र नेहमी आपल्या बरोबर राहतात व मदतीची आवश्यकता असल्यास धावून येतात. त्याचबरोबर मेष, तूळ, मकर राशिवाल्या लोकांबरोबर यांचे पटत नाही. वृश्चिक व मीन राशिच्या लोकांबरोबर जोपर्यंत ते एक दुसर्याचा मान राखतात तोपर्यंतच त्यांचे पटते. वृषभ कन्या व मकर यांच्या बरोबर चांगले संबंध बनु शकतील. मेष वृषभ मकर व कुंभ राशिच्या लोकांबरोबर शत्रुता लवकर निर्माण झालेली असते.
कर्क राशिच्या लोकांना दोन विभिन्न प्रकारच्या रूची असण्याची शक्यता आहे. पहिली दूसर्यांची मदत करणे, दान देणे, समासजसवी संस्थांशी संबंध जोडणे गरजवंताला वेळ देणे व दूसरी म्हणजे अशा कामांना वेळ देणे ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. कधी कधी धर्मार्थ कार्य केल्यामुळे यांना आनंद मिळतो. जलतरण, फिल्म, खेळ, घोडेस्वारी व खेळाच्या कार्यक्रमाशी सबंधित सहभागी होणे यांना आवडते
कर्क राशिच्या लोकांचे भाग्याशाली रत्न मोती आहे. यांचा चंद्र खराब असल्याने मोती घातला पाहिजे. सोमवारच्या दिवशी चांदीच्या अंगठीमध्ये 4 किंवा 6 रत्तीचा खरा मोती किंवा 8-10 रत्तीचा चंद्रमणि तर्जनी बोटात घालून चंद्रदेवाची पुजा करावी. असे करणे शुभ व लाभदायक आहे. यांच्यासाठी पुष्पराज मणिपण लाभकारी आहे. जर यांचा मंगळही खराब असेल तर या राशिच्या लोकांनी पोवळे घातले पाहिजे. पश्चिमात्य संस्कृतीतही कर्क राशिच्या लोक पन्ना घालणेही फलदायी मानतात.
कर्क राशिचे लोके हे वैद्यकिय क्षेत्राकडे आकर्षित होतात. परंतु हे अभिनय, गणित, प्रबंधन क्षेत्रात व ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून या क्षेत्रात गेल्यास देखील सफलता मिळते. कर्क राशिचे लोक हे कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतील ते त्यांच्या जंन्म पत्रिकेवरूनच समजू शकते.
कर्क राशीचे लोक मनापासून खरे असतात. ते दिसायला सुंदर आहेत. ते कुशल मुत्सद्दी असतात आणि त्यांच्या प्रियजनांवर प्रेम करतात. तथापि, ते थोडेसे अहंकारीही असतात आणि ही त्यांची नकारात्मक बाजू आहे. कर्क राशीत जन्मलेले लोक धनवान, शूर, कष्टाळू, गुरूचे प्रिय, धार्मिक वृत्तीचे, अतिशय हुशार, सर्व कामांची जाण असलेले, चांगले मित्र असलेले, अत्यंत रागीट असे मानले जातात. आपल्या कुटुंबासाठी ते कसलाही त्याग करण्याची तयारीत असतात.
या राशीचे लोक खूप विचार करूनच पैसे खर्च करतात. हे लोक भविष्यासाठी पैसे वाचवण्यावर विश्वास ठेवतात आणि या लोकांकडून पैसे काढणे प्रत्येकाच्या क्षमतेत नसते. या राशीचे लोक खूप भावूक असतात. इतरांना मदत करण्यात कधीही मागे हटत नाहीत. ते मोठे स्वप्न पाहतात आणि जीवनात ठसा उमटवण्याची आकांक्षा बाळगतात. जिद्द ही त्यांची मोठी ताकद आहे. ते कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावत नाहीत.
या राशीच्या लोकांना मूर्ख बनवणे सोपे नाही. तर कितीही लांबचा प्रवास केला तरी यांना फक्त घरी परतण्याची चिंता असते. त्यांना जुनी चित्रे, ग्रंथ इत्यादींमध्ये विशेष रस असतो. हे लोक साधारण उंचीचे असतात. त्यांच्या हातांचा पोत सपाट असतो. बोटे जाड असतात आणि तळहाता मऊ असतो आणि तळहाताला फुगवटा देखील खूप प्रगत असतो. या राशीच्या लोकांच्या मानेवर, हातावर किंवा इंद्रियांवर तीळचे चिन्ह असते. त्यांच्या डोक्यावर तीळ किंवा जखमेचेही खूण असते. ते धावण्यात वेगवान असतात, म्हणूनच त्यांची शारीरिक रचना अशी आहे कि ज्यामुळे त्यांना जलद चालण्यात आणि धावण्यात कार्यक्षमता मिळते.
राशीचे थोडक्यात वर्णन
- राशीचक्रातील चौथी रास म्हणजे कर्क. राशिचिन्ह खेकडा आहे. ही चर राशी आहे.
- राशी स्वामी चंद्र आहे. त्यात पुनर्वसू नक्षत्राचे अंतिम चरण, पुष्य नक्षत्राचे चार चरण तसेच आश्लेषा नक्षत्राचे चार चरण येतात.
- कर्क राशीचे लोक कल्पनाशक्तीचे धनी असतात. शनी.सूर्य व्यक्तीची मानसिक स्थिती अस्थिर ठेवतात आणि अहंकार वाढवतात.
- ज्या क्षेत्रात काम करतात, तेथे त्यांना त्रासाला तोंड द्यावे लागते.
- शनी-बुध योगातून राशीची व्यक्ती बुद्धिमान होते. शनी-शुक्र व्यक्तीला पैसा आणि संपत्ती देतात.
- राशीच्या व्यक्ती उपदेश देणाऱ्या होऊ शकतात. बुध गणिताची जाण आणि शनिदेव लेखनाचा प्रभाव देतात.
- खेकड्याने एखादी गोष्ट पंजामध्ये पकडली तर लवकर सोडत नाही. त्याचप्रमाणे हे लोकसुद्धा आपले म्हणणे आणि विचार सहजपणे सोडत नाहीत.
- यांचा मूड बदलायला वेळ लागत नाही. मात्र यांची कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती अचाट असते. वास्तविक जीवनातही आपल्या आयुष्यात राजकुमार अथवा राजकुमारी येईल अशीच यांना अपेक्षा असते. मात्र प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती नशीबवान असतात. आपल्या जोडीदाराला आणि त्यांच्या कुटुंबासाठी या व्यक्ती कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतात
- आयुष्यभर मैत्री जपणारे आणि स्वतःच्या इच्छेनुसार काम करणारे असे यांचे वर्णन होते.
- कर्क राशीच्या व्यक्ती या चंद्राने प्रभावित असल्याने त्यांना नेहमी मानसिक अशांती लाभते. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीमध्ये या व्यक्ती समाधानी नसतात. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी राहतात आणि असंतुष्ट राहतात
- या राशीच्या व्यक्तींना कायम आपल्या जोडीदाराचे लक्ष हवे असते. नाहीतर या व्यक्ती सतत त्याच्यावर रागावू शकतात. या व्यक्ती अत्यंत भावूक आणि संवेदनशील असतात आणि त्याशिवाय मनाने अत्यंत दयाळूही असतात. या व्यक्तींचे पाय नेहमी जमिनीवर असतात. कोणत्याही गोष्टींचा यांना गर्व नसतो.
- परफेक्ट मॅचबद्दल सांगायचे झाले तर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मीन राशींच्या व्यक्ती योग्य आहेत. ही जोडी योग्य म्हटली जाते. कारण या दोन्ही भावनात्मक राशी असून एकमेकांबद्दल दुःख आणि भावना या व्यक्ती पटकन समजून घेऊ शकतात. तसंच ही जोडी उत्तम ठरते. दोन्ही राशीच्या व्यक्ती रोमँटिक असल्याने यांचा संसार उत्तम होतो. तसंच इतर राशीच्या व्यक्तींपेक्षा या दोन्ही राशी एकमेकांसाठी परफेक्ट ठरतात.
(Source : विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/धार्मिक श्रद्धा-शास्त्रातील संकलित माहिती)