(दापोली / प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील माथेगुजर – सुतारवाडी येथील गतिमंद पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी नारायण बाळू शिगवण (६१) याला येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी शुक्रवारी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ही घटना ४ नोव्हेंबर २०१८ मध्ये घडली होती.
मानसिक गतिमंद असलेल्या पीडित मुलीस खाऊचे आमीष दाखवत तिला बंद घराच्या पडवीत नेऊन बलात्कार केला होता. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नराधमास अटक केली. याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
शुक्रवारी खटल्याची सुनावणी झाली असता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर अँड. मृणाल जाडकर यांनी युक्तीवाद केला. सबळ पुरावा व केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. दंडाच्या १. लाखाच्या रकमेतील ८० हजार रुपये पीडितेस देण्याचे सूचित करण्यात आले आहे.