(ठाणे / उदय दणदणे)
झुंजुमुंजु लघुचित्रपटाच्या घवघवीत यशानंतर , गणेश सिताराम माळी लिखित / दिग्दर्शित, दोन अंकी विनोदी नाटकं “अफलातून” रसिकांच्या भेटीला मुबंई रंगमंचावर येतं असून या नाटकाचा शुभारंभाचा पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे रविवार दिनांक,२६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३-३० वाजता होत आहे.
विनोदी अंगाने लिहिलेले हे नाटक नक्कीच सर्वांचे मनोरंजन करेल असा विश्र्वास गणेश माळी यांनी व्यक्त केला. नटखट प्रॉडक्शन्स आणि मुक्ता प्रॉडक्शन्स ची निर्मिती असलेल्या या नाटकाला एस एफ (sf ) चॅलेंजर ग्रूपने व धर्मी फिल्म प्रॉडक्शन्सने सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. नाटकाबद्दल बोलताना गणेश माळी यांनी सांगीतले की आपणं नेहमीच्या धकधकीच्या जीवनात तणावात असतो, दुःखात असतो. हे नाटक नक्किच आपल्याला काहीप्रमाणात तणावमुक्त करून मनोसोक्त हसण्यास भाग पाडेल. या नाटकाचे निर्माते सुशील मोरे व अभिषेक पाडेकर असुन कलाकारांची नावे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. नाटयप्रयोग काहीतरी वेगळा अनुभव देऊन जाईल असा ठाम विश्वास लेखक/दिग्दर्शक गणेश माळी यांनी व्यक्त केला.
नाटकाची विविध माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येतं असुन कलाकार प्रचंड मेहेनत घेत आहेत,सद्या अनेक विनोदी नाटकं व्यवसायिक रंगभूमीवर सुरू असताना “अफलातून” नाटक नक्किच लोकांना एक वेगळी पर्वणी ठरेल असं गणेश माळी यांनी सांगितले.
अफलातून नाटकाच्या शुभारंभ प्रयोगाला हाऊसफुल्ल शुभेच्छा देण्यासाठी रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे संपूर्ण “अफलातून’ कलाकार टीमतर्फे प्रेक्षकांना आवाहन करण्यात आले आहे. प्रेक्षक वर्गामध्येही या नाटकाची जोरदार चर्चा व उत्सूकता असल्याची पहायला मिळत आहे. अनेक मान्यवर कलाकार मंडळी गणेश माळी आणि अफलातून टीमला आपल्या शुभेच्छा देत आहेत.
लेखन दिग्दर्शन आणि अभिनय या तीन गोष्टींचे शिवधनुष्य गणेश माळी यांनी लिलया उचलले असल्याचे अफलातून टीमकडून सांगण्यात आले.