(रत्नागिरी)
संपूर्ण गणेशोत्सव काळ हा भारनियमन मुक्त करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी शहर पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली.
कोकणासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा गणेशोत्सव सण थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात सर्व कुटुंबातील हजारो चाकरमानी या काळात खास सुट्टी घेऊन गावी घरी येतात. मित्र व नातेवाईकांसोबत हा उत्सव काळ उत्साहात साजरा करतात. दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सार्वजनिक गणेशोत्सवात देखील मोठ्या प्रमाणात कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येतात. अशा मंगलप्रसंगी भारनियमन झाल्याने उत्सवाचा रसभंग होतो. हे टाळण्यासाठी संपूर्ण गणेशोत्सव काळात भारनियमन होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर सचिव अजिंक्य केसरकर, उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण, महिला उपशहर अध्यक्ष शिल्पाताई कुंभार, शाखाध्यक्ष साहिल वीर, मनसे रस्ते आस्थापना शहर संघटक सुशां घडशी, अनंत शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते