(मुंबई)
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे बुकिंग काही मिनिटातच फुल झाल्याने चाकरमान्यांच्या नाराजी निर्माण झाली आहे. याची दखल घेत खासदार राऊत यांनी या संदर्भात कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता व कोकण प्रवासी संघटनांची बैठक घेतली.
सी बी डी बेलापूर येथील झालेल्या आमंत्रित बैठकीत कोकण रेल्वे कॉ. लि. चे अध्यक्ष आणि संचालक श्री. संजय गुप्ता यांच्या अधिपत्याखाली, कोकण विभागाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार श्री. विनायक राऊत तसेच केआरसीएल चे प्रशासकीय अधिकारी वर्ग, संबघीत कर्मचारी त्याचप्रमाणे विविध कोकण प्रवासी संघटना, संबंधित संघटना व कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख सल्लागार श्री राजू कांबळे, सचिव श्री. दर्शन कासले या विषयासंदर्भात चर्चा विवरणासाठी आवर्जून उपस्थित होते.
या चर्चेत कोकणातील गणेशोत्सवासाठी चार महिने आगाऊ आरक्षण तिकीट विक्रीत प्रचंड प्रमाणात झालेल्या सावळागोंधळात वा अमर्यादीत गडबड घोटाळा, तिकिटांचा काळाबाजार संबंधी खासदार श्री. विनायक राऊत यांनी चर्चा करीत याबाबत जाब विचारत खुलासा करण्याची मागणी केली. तसेच गणेशोत्सवासाठी अधिक गाड्यांची मागणी करीत कोकण रेल्वे प्रवाशांस सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची काळजी घेणेसंबंधीही सूचना करण्यात आली. इतर विषयांतही चर्चा करून कोकण कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे संघटनेच्या वतीने श्री. राजू कांबळे, श्री. दर्शन कासले, श्री. संतोष पवार, श्री. संतोष निकम, श्री. यशवंत बावदाणे, श्री. सुहास तोडणकर, श्री. तुषार साळवी, श्री. समीर नलावडे, श्री. गोपीचंद गुरव, श्री. नागेश गुरव, श्री विजय जगताप, श्री. प्रमोद घाग, श्री. नामदेव चव्हाण, श्री. साहील सकपाळ यांनी खासदार श्री. विनायक राऊत यांना काही विशेष महत्त्वाच्या मुद्यांवरील निवेदन यावेळी सादर केले.