(रत्नागिरी)
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 16, 18 मार्च दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण क्रीडा संकुल सावर्डे चिपळूण जिमनॅस्टिक हॉल इथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत रत्नागिरीच्या सुरभी राजेंद्र पाटील हीने U-16 किलो वजनी गटात क्योरोगी या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेकरिता संपुर्ण महाराष्ट्रतुन सुमारे 600 खेळाडूनी सहभाग नोंदवला होता. सुरभी गणराज तायक्वांदो क्लब छत्रपती नगर येथे सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांच्याकडे गेली 5 वर्षे पासून प्रशिक्षण घेत आहे.
तीची निवड महाराष्ट्र संघात झाल्याबदल जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री.उदय सांमत, जेष्ठ उद्योजक श्री.किरण सांमत, जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.किरण बोराडे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे (बीड), धुळीचंद मेश्राम (गोंदिया), महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेशवरराव कररा, कार्यकारणी सदस्य नीरज बोरसे (औरंगाबाद), सदस्य अजित घारगे (जळगाव), सतीश खेमस्कर (चंद्रपूर), शिवछत्रपती पुरस्कार खिलाडू तायक्वांदो शिवछत्रपती पुरस्कार राज्य क्रीडा मार्गदर्शक तायक्वांदो असे दोन वेळा पुरस्कार मानकरी अतिरिक्त उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, सुभाष पाटील तांत्रिक कमिटी अध्यक्ष सुशांत भोयार, रत्नागिरी तायक्वांडो असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री शैलेश गायकवाड (PSI), श्री विश्वदास लोखंडे (उपाध्यक्ष) जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक बेल्ट ) जिल्हा कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी (शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते) गणराज तायक्वॉडो क्लब चे अध्यक्ष श्री प्रशांत मनोज मकवाना, उपाध्यक्ष श्री अभिजित विलणकर, सचिव सौ.रंजना मोडूळा, खजिनदार सौ.नेहा किर, सौ. साक्षी मयेकर, सौ.पुजा कवितके, सौ कनिष्का शेरे, श्री.भगवान गुरव यांनी एस.आर.के क्लबचे अध्यक्ष. श्री.शाहरुख शेख, श्री.मिलिंद भागवत क्रिडा शिक्षक अनिकेत पवार यांनी सुरभीला शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य व जिल्हाभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.