[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
”गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या…’ जयघोषांसह रत्नागिरीत ठिकठिकाणी शनिवारी (ता. २३) पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.विसर्जन शांततेत आणि भक्तीमय वातावरणात झाले. विसर्जनासाठी पालिकेने चोख व्यवस्था केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणरायाचे गणेशचतूदर्शीला आगमन झाले. खीर, मोदक नैवद्य झाला. सकाळ संध्याकाळ आरती झाली. आज पाचवा दिवस उजाडला तो निरोपाचा. आज दुपारी चार वाजल्यापासून पाच दिवसांचा पाहूणचार घेतलेल्या गणरायाच्या विसर्जन सोहळ्याला सुरूवात झाली. विसर्जन मिरवणूका वाजत गाजत सहकुटुंब निघाल्या होत्या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर, अशी आर्त साद घालत मूर्तीना निरोप देण्यात आला.
फोटो १- जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या गणरायाचे विसर्जन करताना क्षण…
फोटो २ – समुद्र किनारी बाप्पासमोर शेवटची आरती करताना कुटुंब….
फोटो ३ – “गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या…” जयघोष करताना गणेशभक्त….
फोटो ४ – गणरायाचे विसर्जन स्थळी ( मांडवी समुद्र किनारी) गाडीतून आगमन…
फोटो ५ – विसर्जन मिरवणुकीत महिलांनी देखील वाद्य वाजवले तो क्षण…
फोटो ६ – वैशिष्ट्यपूर्ण लाल गणपतीचे थाटात विसर्जन करतानाचा क्षण…
फोटो ७ – मांडवी चौक ते मांडवी समुद्र किनारा परिसरात भक्तीमय झालेलं वातावरणात…
फोटो ८ – विसर्जन स्थळी पोलीसांचा तगडा बंदोबस्त….
फोटो ९- रत्नागिरी पालिकेने निर्माल्य संकलनासाठी मांडवी येथे एक गाडी ठेवली होती.
फोटो १० – कोस्टगार्डचे समुद्र किनारी हेलिकॉप्टर फिरताना…