(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत गणपतीपुळे, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा गणपतीपुळे व पर्यटक निवास गणपतीपुळे आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने “हर घर तिरंगा” जनजागृतीसाठी संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. गणपतीपुळे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा गणपतीपुळे येथून सकाळी आठ वाजता प्रभात फेरीला ढोल-ताशांच्या गजरात तसेच घोषणा देत मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली.
प्राथमिक शाळा गणपतीपुळे ते एमटीडीसी गणपतीपुळे आपटा तिठा मार्गे मानेवाडी प्राचीन कोकण ते बस स्थानक गणपतीपुळे व पुन्हा प्राथमिक शाळा गणपतीपुळे येथे या प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.
या प्रभात फेरी ला सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार ग्रामसेवक प्रवीण चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संजय माने, शुभांगी ठावरे, सारिका भिडे, मृणाल घनवटकर तसेच पर्यटक निवास गणपतीपुळे चे व्यवस्थापक वैभव पाटील, सहाय्यक व्यवस्थापक विनायक काळे, रुपेश करंडे ,सुरज सूर्वे, सचिन गावडे तसेच ग्रामस्थ बाबाराम माने, प्रमोद केळकर, विनायक सावंत, विजय भिडे, विद्याधर शेंडे ,आरोग्य सेवक मोहन सातव, पोलीस पाटील विश्वनाथ पाटील प्राथमिक शाळा गणपतीपुळे मुख्याध्यापिका स्मिता जोशी व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक वर्ग सहभागी झाले होते.