(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत तसेच सिंधुरत्न चे सर्वेसर्वा भैया सामंत आणि अण्णा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्र प्रमुख गजानन तथा आबा पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश साळवी यांच्या सूचनेनुसार आज सोमवारी शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रत्येक गावात, वाडीवस्तीत समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे छत्र्यांचे वाटप कोतवडे जिल्हा परिषद गट युवा सेना विभाग प्रमुख अमित घनवटकर,शाखा प्रमुख महेश चव्हाण,शाखा प्रमुख वैभव बारगुडे, उप शाखा प्रमुख अजय ठावरे आणि इतर शिवसैनिक यांच्या उपस्थितीत व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच युवा सेना कोतवडे जिल्हा परिषद गट मार्फत तालुका प्रमुख तुषार साळवी आणि विभाग प्रमुख तारक मयेकर यांच्या सूचनेनुसार पूर्ण प्राथमिक शाळा गणपतीपुळे येथे दिनांक 20 जून 2023 रोजी सर्व विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी चाचणी करण्यात येणार आहे.
त्यानंतर दिनांक 21 जून रोजी पूर्ण प्राथमिक शाळा गणपतीपुळे येथे “विद्यार्थी महोत्सवाचे ” आयोजन करण्यात आले असून त्यावेळी विविध शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.या सर्व सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कोतवडेण जिल्हा परिषद गटाचे युवा सेनेचे विभागप्रमुख अमित घनवटकर यांनी केले आहे