( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे झी मराठी या वाहिनीवर गाजलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला राणादा अर्थात हार्दिक जोशी यांनी नुकतीच सहकुटुंब भेट दिली. गणपतीपुळे येथील कल्पतरू रेसिडेन्सीचे आणि चिरेखाण मालक कल्पेश सुर्वे यांचे लहानपणीचे मित्र हार्दिक जोशी व सध्याच्या मराठी मालिकेतील स्टार अभिनेते राणादा म्हणून संपूर्ण घराघरात पोहोचले गणपतीपुळे येथे आल्यावर त्यांनी आपला बालपणीचा मित्र कल्पेश सुर्वे यांच्याबरोबर गप्पागोष्टी मारताना येथील स्थानिक पत्रकारांशी ही दिलखुलास गप्पा मारल्या .
यावेळी त्यांनी कोकणासारखे निसर्गसौंदर्य अन्य कुठल्याच ठिकाणी नसून सध्या कोकणातील रस्त्यांची अवस्था खूपच खराब झाली आहे त्यामुळे कोकणातील रस्ते पहिल्यांदा सुधारावे लागतील असे मत व्यक्त केले.तर आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, गणपतीपुळे येथे आम्हांला दुपारी पोचयाचे होते परंतु पोचायला रात्रीचे नऊ वाजले . या क्षेत्रात काम करताना सर्व कामे महत्वाची असतात जो तो आपल्या जागी मोठा असतो तेव्हा काम करताना लहान किंवा मोठे असे न करता सर्वांनी मिळून काम केल्याने त्याचे फळ आपल्याला मिळतेच तसेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेत मला पैलवानाचे काम करायचे होते परंतु शूटिंगच्या दरम्यान खूप मार खावा लागला तसेच मला काहीच माहिती नव्हती आणि मी त्यांना बकरा मिळालो होतो याच दरम्यान मला एका फटक्यामुळे पंधरा ते वीस मिनिटे बेशुद्ध पडलो होतो पण यातून मी काहीतरी शिकलो. तसेच या मालिकेसाठी मला 23 किलो वजन वाढवावे लागले यासाठी विनोद चंन्ना यांचे मार्गदर्शन मिळाले कलाकार म्हणून मोठे होण्यामागे सेट होईल.
पडद्यामागे काम करणाऱ्या सर्वच मंडळींचा हात असतो तसेच अंजली ही माझी मैत्रीण असून लग्नाची मागणी माझ्या आईने तिच्याकडे केली ते सुद्धा ही मालिका संपल्यावर. परंतु तिने जवळजवळ सहा ते सात महिन्यांनी मला होकार दिला त्यामुळे अंजलीचे माझे मालिका संपल्यानंतर एकमेकात जीव रंगला असल्याचे राणादा यांनी सांगितले. मालिका सुंदर व प्रेक्षकांना कशी आवडेल यावर मोठी मेहनत घेतली जाते तसेच मला माझ्यात काय कमी आहे व ते मी कसे सुधारेल यासाठी मी टिप्स लिहून ठेवायचो व त्यावर मेहनत घेऊन सुधारण्याचा प्रयत्न करायचो असे राणादा यांनी सांगितले गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात आपला बालपणीचा मित्र राहतो त्याच्याकडे जाण्याचा योग येत नव्हता मात्र दोन महिने सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळे ला जायचे ठरले येथे आल्यावर पारंपारिक पद्धतीने उकडीचे मोदक व शाकाहारी जेवण जेवल्यावर मनातून तृप्त झाल्यासारखे वाटले तसेच येथे आल्यावर बाहेर कुठे न जाता घरात असल्यासारखेच वाटत होते.येथील स्वयंभू श्रीं चे दर्शन व श्रीं ची विधिवत पूजा गणपतीपुळे येथे आलेल्या राणादाने करून दर्शन घेतले तसेच यावेळी संस्थांनच गणपतीपुळेमार्फत राणादा उर्फ हार्दिक जोशी यांना गणपतीची फोटो फ्रेम ,माहिती पुस्तिका व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.या संपूर्ण गणपतीपुळे भेटीत राणादा उर्फ हार्दिक जोशी यांनी समाधान व्यक्त करुन आपली अविस्मरणीय भेट ठरल्याचे भावोद्गागार प्रसार माध्यमांशी बोलताना काढले.