(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील पर्यटक निवास गणपतीपुळे येथे आज मंगळवारी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम व दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणपतीपुळे पर्यटन निवास येथे जागतिक पर्यटन दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला.
‘पुनर्विचारात्मक पर्यटन’ हे यावर्षीचे घोषवाक्य होते. यावेळी गणपतीपुळे बीच स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, कोरोना बूस्टर डोस, प्लास्टिक मुक्त अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात आलेे. त्यानंतर पर्यटक निवास तसेच पूर्ण प्राथमिक शाळा गणपतीपुळे शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पर्यटन निवास कर्मचारी यांच्यावतीने पर्यटन दिंडी काढण्यात आली. तसेच यावेळी पर्यटक निवास व्यवस्थापन वैभव पाटील यांनी जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व पटवून सांगितले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सदर जागतिक पर्यटन दिन रत्नागिरी प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक वैभव पाटील, सहाय्यक व्यवस्थापक रुपेश करंडे, गणपतीपुळे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता जोशी, उपशिक्षक निळकंठ पांपटवार अंगणवाडी सेविका शुभांगी केदार पर्यटन निवास कर्मचारी सुजन गोवळकर, संजय रामाणी, दिलीप भुते, अतुल पाटील, सचिन गावडे, दशरथ शिंदे, प्रियांका रसाळ आदी कर्मचारी उपस्थित होते.