(गणपतीपुळे,/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रीं च्या मंदिरात विजयादशमीनिमित्त श्रीं च्या समोर फुलांच्या पाकळ्यांपासून आपट्याच्या पानांची आरास तयार करण्यात आली गणपतीपुळे येथील श्रीं च्या मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर व त्यांचे सहकारी यांनी सदर आरास तयार केली.
विजयादशमी निमित्त गणपतीपुळे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी व आपट्याची पाने अर्पण करण्यासाठी दिसून येत होते. त्यामुळे ग्रामस्थांना आपट्याची पानांची आरास पाहायला मिळाली. तसेच विजयादशमी निमित्त सायंकाळी श्रीं ची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गणपतीपुळे गावातील आपटा तिठा या ठिकाणी असलेल्या आपट्याच्या झाडांची पालखी समवेत जाऊन पूजाअर्चा करण्यात येते व त्यानंतर येथील झाडांची पाने (सोने )लुटले जाते. येथील पाने हे कुणालाही न देता येथील ग्रामस्थ सदरची पाने आपल्या पेटीत तिजोरीत देवाच्या ठिकाणी ठेवली जाण्याची प्रथा असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी सांगितले.