(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड परिसरातील प्राथमिक शाळांमधील बीडीएस परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान गणपतीपुळे येथील ओम साई शांती ग्रुपच्या वतीने करण्यात आला. ओम साई शांती ग्रुपचे अध्यक्ष विनायक सावंत यांच्या विशेष संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम गुरूवारी हनुमान जयंतीच्या शुभदिनी राबविण्यात आला.
यावेळी मालगुंड येथील प्राथमिक शाळा दुर्गवळीवाडी शाळेतील इयत्ता दुसरीतील बीडीएस परीक्षेतील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनी सिद्धी धनेश दुर्गवळी हिने 94 गुण मिळवून ब्रांझ पदक प्राप्त केले तसेच कवी केशवसुत आदर्श प्राथमिक विद्यालय मालगुंड येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी स्वरा संदीप डांगे हीने 82 गुण मिळवून ब्रांझ पदक प्राप्त केले. त्याचबरोबर मालगुंड येथील जीवन शिक्षण आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कुमारी माहिरा म.जहिर सय्यद या इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनीने 89 गुण मिळवून ब्रांझ पदक तर कुमारी निहिरा संतोष केळकर या इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीने 89 गुण मिळवून सिल्व्हर पदक त्याचबरोबर अर्जुन कौस्तुभ केळकर या इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांने 85 गुण मिळवून ब्रांझ पदक तर कुमार अरिहंत बाबासो बेडक्याळे या इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्याने 85 गुण मिळवून ब्रांझ पदक प्राप्त केले.
या सर्व बीडीएस परीक्षेतील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान गणपतीपुळे येथील ओम साई शांती ग्रुपच्या वतीने करण्यात आला. यावेळी ओम साई शांती ग्रुपचे अध्यक्ष विनायक सावंत यांचेसमवेत गणपतीपुळे येथील चंडिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष गोताड, पत्रकार तथा व्यावसायिक वैभव पवार, संदीप रहाटे भगवतीनगर येथील पूर्ण प्राथमिक शाळेचे उपशिक्षक अनिल शेटये आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
मालगुंड येथील प्राथमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी ओम साई शांती ग्रुपच्या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.