(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामपंचायत व जेएसडब्ल्यू कंपनी यांच्यावतीने एक तारीख- एक तास महाश्रमदान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महात्मा गांधी जयंती निमित्त गणपतीपुळे येथे साफसफाई मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता उपक्रमात गणपतीपुळे मंदिर परिसर, एमटीडीसी परिसर तसेच एमटीडीसी पार्किंग परिसर, गणपतीपुळे समुद्रकिनारा आदी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, गणपतीपुळे ग्रामसेवक प्रवीण चौधरी, बी डी ओ जे.पी.जाधव ,विस्तार अधिकारी पी.एन.सुर्वे एमटीडीसी चे व्यवस्थापक वैभव पाटील, संजय रामाणी, गणपतीपुळे सरपंच श्रीमती कल्पना पक्ये, गणपतीपुळे पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव, उपसरपंच महेश केदार, सदस्या शुभांगी ठावरे, सारिका भिडे, मृणाल घनवटकर,संजय माने, राज देवरुखकर , चंडिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष गोताड, खजिनदार अक्षय सुर्वे ,सदस्य दिनेश ठावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत गणपतीपुळे, एमटीडीसी, जेएसडब्ल्यू, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, चंडिका मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे, बळीराम परकर विद्यालय मालगुंड आदींनी गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर असणारा साफसफाई मोहीम यशस्वी केली. यावेळी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून एक तारीख एक तास महाश्रमदान या उपक्रमाचे नीटनेटके आयोजन करण्यात आले होते.हा स्वच्छता उपक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रवीण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ क्लार्क प्रशांत गुरव, क्लार्क ऋषिकेश माने, ग्रामपंचायत कर्मचारी मिलिंद माने,अभ्यंगत कर कर्मचारी गणेश रहाटे, तेजस देवरुखकर आदींसह साफसफाई कर्मचारी यांनी मोठी मेहनत घेतली.हा उपक्रम संपल्यानंतर ग्रामपंचायत गणपतीपुळेकडून उपस्थितांना अल्पपोहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी मोठा पाऊस असताना सुद्धा आदर्श प्राथमिक शाळा यांच्याकडून स्वच्छता अभियाना दरम्यान अमृत कलशाची पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिक्षण तज्ञ विनायक सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता जोशी, उपशिक्षक सचिन चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदिती रानडे, मदतनीस दीपा माईन, अन्विता पाचकुडवे, अंगणवाडी सेविका शोभा केदार,शुभांगी पाचकुडवे, श्रीमती कल्पना गावणकर, स्नेहा गोताड आदी उपस्थित होते.