(गणपतीपुळे /वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेल्या रेखा प्रफुल्ल भानुशाली वय वर्षे 36 या अचानक गायब झाल्या असल्याची नापत्ता खबर जयगड पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे
गणपतीपुळे तीर्थक्षेत्र येथे दिनांक 20 -9 -2023 रोजी शैलेश दयाराम -भानुशाली राहणार मुक्काम पोस्ट कोंडगाव साखरपा, मुरलीधर आळी घर नंबर 803 तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांनी गणपतीपुळे पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांची बहीण रेखा प्रफुल्ल भानुशाली वय वर्षे 36 राहणार गणपती नेत्रालय सोमेश रेसिडेन्सी अमित हॉटेल जवळ जालना ही गणपती सणासाठी साखरपा या ठिकाणी आली होती. घरातील गणपतीचा सण आटोपत त्या गणपतीपुळे येथील देवदर्शन करण्यासाठी आल्या होत्या .देवदर्शन आटोपल्यानंतर समुद्रावर फेरफटका मारण्यासाठी सर्वच घरातील नातेवाईक गेले होते.
समुद्रावर थोडा वेळ बसल्यानंतर आपले नातेवाईक व रेखा प्रफुल्ल भानुशाली या नाश्ता करण्यासाठी गणपतीपुळे मंदिराजवळील हॉटेल सम्राट या ठिकाणी नाश्त्यासाठी आल्या. त्याचवेळी रेखा यांच्या चप्पल समुद्रावर राहिल्या असल्याच्या त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी समुद्राकडे धाव घेतली. मात्र बराच वेळ झाला तरी रेखा या पुन्हा नाश्ता करण्यासाठी आल्या नसल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. या वेळेला मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या मंदिरामध्ये नजीक सेल्फी काढताना दिसत असून सदरच्या रेखा या मंदिरापासून दक्षिणेकडे चालत गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदरचे रेखा यांचे लोकेशन समुद्रावरून स्मशानभूमीपर्यंत व तिथून पुढे दक्षिणेकडे मिळाले असून रेखा या नेमक्या कुठे गेल्या हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
सदरच्या रेखा प्रफुल्ल भानुशाली या नेमक्या कुठे गेल्या यावर जयगड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळवी,पोलीस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव, तसेच होमगार्ड सुरज जाधव अनिकेत जाधव, श्री धावडे आदी तपास करत आहेत. सदरच्या रेखा प्रफुल्ल भानुषाली या नेमक्या कुठे गेल्या आहेत याचा पोलीस शोध करत आहेत.