(रत्नागिरी)
गडनरळ सामाजिक विकास संस्था, मुंबई विभाग आयोजित स्व. मुकुंद (दादा) धनावडे चषक ही भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दि. ०७ जाने २०२४ रोजी मिरा रोड, मुंबई येथे पार पडली.. सदर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आलेल्या सर्व संघांनी खेळाचा आनंद घेतला.
या स्पर्धेत प्रथम विजेता संघ- झुंजार टीम वीरवाडी, कळझोंडी आणि उपविजेता संघ पालेश्वर, गुहागर या दोन्ही संघाना ट्रॉफी तसेच उत्कृष्ठ फलंदाज देवदास वीर, उत्कृष्ट गोलंदाज अमित वीर, सामनावीर दृवेश, पार्लेश्वर यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य आणि ग्रामस्थ यांनी उत्तम कामगिरी बजावत सदर कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पडला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून १४ जानेवारी, २०२४ रोजी कुणबी विद्यार्थी वसीतगृह, मुलुंड येथे होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याची वारंवार जनजागृती केली. गडनरळ सामाजिक विकास, संस्थे तर्फे रत्नागिरी तालुक्यातील गडनरळ गावात विविध सामाजिक उपक्रमे, विकासात्मक कामे करण्यात आलेली आहेत. गावच्या प्रतिष्ठेचा प्रतीक म्हणून संस्थेला प्रथम प्राधान्य दिले जाते. सदर क्रीडा स्पर्धेची धुरा सांभाळणारे आपले माजी अध्यक्ष श्री. अरुण चौघुले आणि कमिटी सदस्य मयुरेश गणेश चौघुले, हर्षद धनावडे , प्रज्ञेश धनावडे, अंकुश धनावडे तसेच पंच श्री. अनिल धनावडे, दिनेश वीर, शाहीर जितेंद्र धनावडे, संजय भातडे, देवधर/भालचंद्र लक्ष्मण भातडे, मनीष धनावडे व अन्य युवा कार्यकर्ते व विशेष सहकार्य पंचवटी ग्रुपचे श्री. प्रमोद गोपाल चौघुले, श्री. केशव भातडे, सूर्यकांत धनावडे, शंकर गुणाजी चौघुले, संतोष धनावडे, संदीप गोताड व संस्थेचे अध्यक्ष दिनकर भातडे यांनी स्पर्धा यशस्वीरित्या राबविली.