(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील गडनरळ कोळीसरे व वैद्यलावगण ग्रुप ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते मंगेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगेश सावंत यांनी गडनरळ येथील बौद्धजन पंचायत समिती गावशाखेचे माजी पदाधिकारी काम केले आहे.
तसेच बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्या रत्नागिरी कार्यकारिणीवर विद्यमान कोषाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. याशिवाय बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद खंडाळा संघटनेच्या माजी अध्यक्षपदी त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम केले आहे. गावातील विविध सामाजिक कार्यात त्यांचा मोठा लक्षणीय सहभाग असतो.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गडनरळ कोळीसरे वैद्यलावगण या ग्रुप ग्रामपंचायतीच्या नव्याने जाहीर झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी गडनरळ कोळीसरे वैद्यलावगण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी धनावडे, उपसरपंच संजय सावंत, माजी अध्यक्ष गणपत भुवड, पोलीसपाटील गणपत धनावडे, ग्रामपंचायत सदस्या अंजली सावंत, ग्रामसेवक प्रक्षाळे, राजेंद्र गोताड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगेश सावंत यांची महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे गडनरळ बौद्धजन पंचायत समिती गावशाखेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळ्याचे अध्यक्ष भाई जाधव आदींसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.