(संगलट/ इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील खोपी गावच्या डोंगरावर भागामध्ये खेड पोलिसांनी गावठी हातभट्टीवर जोरदार कारवाई केल्याने सुमारे 94 हजार रुपयाचे साहित्य जप्त केले. यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी बाबू बालाजी गोरे व रुपेश बालाजी गोरे यांच्यावर खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 287/2023 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही दिनांक 16/09/2023 रोजी करण्यात आली.
गोरेवाडी जंगल भागामध्ये गावठी दारू हातभट्टी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान, पोलिसांनी धाड टाकून गावठी दारूउपयोगी गुळ नवसागर मिश्रित कुजलेल्या रसायनासह लोखंडी टाकी तसेच सात प्लास्टिकच्या प्रत्येकी 500 लिटर टाक्या नष्ट करण्यात आल्या. गावठी दारू बाबत अनेक तक्रारी होत होत्या याची दखल घेऊन खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नितीन भोयर यांनी आपला फौजफाटा प्रत्यक्ष जागेवर जाऊन दारू जप्त करून भट्टी नायनाट करून दारू नष्ट करण्यात आली. याबाबत अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.