( रत्नागिरी )
प्रभाग क्रमांक 7 मध्ये नळपाणी योजनेअंतर्गत खोदून ठेवलेला रस्त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज पुसाळकर यांनी रत्नागिरी नगर परिषदेला जाब विचारला आहे. त्यांनी याबाबत नगर परिषदेला निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, थिबा पॅलेस पॉलिटेक्निकल कॉलेज पासून विश्वनगर भागातील रस्ता हा शहरा अंतर्गत होणाऱ्या नळपाणी योजनेसाठी रस्ता खोदण्यात आला आहे. या खोदून ठेवलेला रस्ता बरेच दिवस तसाच आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांना प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना त्या मार्गांवरून जाताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या मुळे संतप्त रहिवासी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होतं आहे. याविषयाकडे गांभीर्यपूर्वक दखल घेऊन स्थानिकांना होणाऱ्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.