(मुंबई)
पूनम पांडेने आपले सर्व्हायवल कॅन्सरने निधन झाल्याचं सोशल मीडियावर जाहीर करुन प्रसिद्धीचा स्टंट केल्याने वाद निर्माण झाला आहे. तिच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी असंख्य सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर निर्णयाबाबत सडकून टीका केली आहे. मात्र, या सर्व उलटसुलट प्रतिक्रियांदरम्यान, चित्रपट निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्माने पूनमला पाठिंबा दिला आहे. प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सर्व्हायव्हल कॅन्सरच्या जागृतीसाठी केलेल्या प्रयत्नाची प्रशंसा करुन तिचा हेतू योग्य असल्याचे म्हटले आहे.
Hey @iPoonampandey the extreme method u employed to draw attention to this issue might attract some criticism , but no one can question ur INTENT nor what u ACHIEVED with this HOAX .. Discussion on cervical cancer is TRENDING all across now 🙏🙏🙏 Your SOUL is as BEAUTIFUL as YOU…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) February 3, 2024
पूनमने तिच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मी जिवंत आहे. मी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला बळी पडले नव्हते. पण दुर्दैवाने, या आजाराने आपला जीव गमावलेल्या असंख्य महिलांसाठी असेच म्हणता येणार नाही. माझ्या आईला कॅन्सर झाला होता. आम्हाला माहित आहे की आम्ही काय केले. आमचे घर हादरले होते. यासाठी मी जनजागृतीसाठी हा वेगळा प्रयत्न केला”.
अभिनेत्री पूनम पांडे हिचे गुरूवारी रात्री निधन झाल्याचे सांगितले गेले. धक्कादायक म्हणजे थेट पूनम पांडे हिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले गेले की, गर्भाशयातील कॅन्सरमुळे पूनम पांडे हिचे निधन झाले. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र, पूनम पांडे हिच्यावर नेमके अंत्यसंस्कार कुठे होणार याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. पूनम पांडे हिची बहीण मुंबईतील वरळी भागात राहते. तिला देखील संपर्क करण्यात आला. मात्र, तिचाही फोन बंद होता. यामुळे पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल अधिकच संभ्रम हा निर्माण झाला. पूनम पांडे हिच्या मुंबईतील घराकडे चाहत्यांना धाव घेतली होती.
https://www.instagram.com/reel/C24C_LyIy6m/?utm_source=ig_embed&ig_rid=a39ca43e-d021-4b47-a672-466b370ca991
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी पूनम पांडे हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लोकांची फसवणूक केल्या प्रकरणात पूनम पांडे हिच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.