(चिपळूण)
न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनी कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्याना भारतीय संस्कृतीची सविस्तर माहिती देण्यासाठी केरळ राज्याचे देश उभारणीसाठी असलेले योगदान, खाद्य, संस्कृती,पे हराव, सण, भाषा,आहार यावर विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री.योगेश नाचणकर यांनी भव्यऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित करून विद्यार्थ्याना माहिती दिली.
या स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी सर्व विद्यार्थ्याना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.योगेश नाचणकर, सौ.स्मिता चाळके यांनी विद्यार्थ्याना केरळ राज्याची संस्कृतीबाबत मार्गदर्शन केले. केरळ राज्याचा सांस्कृतिक वारसा जसे पेहराव, खानपान, सण उत्सव आदिंबाबत राष्ट्रांच्या उभारणीत केरळ राज्याचे योगदान त्याची महती दर्शविणारे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
श्री.योगेश नाचणकर यांच्या संकल्पनेतून वर्चुअल रियालिटी (VR) एक आगळावेगळा नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्याचा या उपक्रमास उदंड प्रतिसाद लाभला. केरळमधील प्रसिद्ध ठिकाणे कुमारकोम, बॅक वॉटर, कन्नूर, अद्यापारा वॉटर फॉल्स इ ठिकाणांना भेट देताना विद्यार्थ्यांचा उत्साह व्दिगुणित होता. यावेळी मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, उपमुख्याध्यापक श्री.विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील, श्री.अमित आवले, श्री.धनंजय राजेशिर्के, श्री.मिलिंद यादव उपस्थित होते.